सिद्धूंचा नवा पक्ष ‘आवाज-ए-पंजाब मोर्चा’

sidhu-759-e1472840654930
भाजपला षटकार; ‘आप’लाही गुगली
चंदीगड, दि. २ (वृत्तसंस्था) – भाजपला षटकार ठोकून बाहेर पडलेले माजी कसोटीपटू नवज्योतसिंग सिद्धू यांनी आम आदमी पक्षालाही गुगली टाकला आहे. सिद्धू आणि हॉकी संघाचे माजी कर्णधार परगटसिंग यांनी एकत्र येऊन ‘आवाज-ए-पंजाब’ या नव्या पक्षाची स्थापना केली आहे. ८ सप्टेंबरला या पक्षाची अधिकृत घोषणा होणार असून, पुढील वर्षी होणार्‍या पंजाब विधानसभा निवडणुकीत आता चुरस वाढली आहे.
राज्यसभा सदस्यत्वाची शपथ न घेता सिद्धू हे भाजपबाहेर पडले होते. भाजपशी काडीमोड घेतल्यानंतर सिद्धू ‘आप’मध्ये जाणार अशी चर्चा होती. सिद्धू यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांच्याशी चर्चाही केली होती. पंजाब विधानसभा निवडणुकीत सिद्धू हे ‘आप’चे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असतील, अशी चर्चाही रंगली होती. मात्र, सिद्धू यांना मुख्यमंत्रिपदाबाबत ठोस आश्‍वासन न मिळाल्यामुळे त्यांनी नवा पक्ष स्थापनेचा निर्णय घेऊन ‘आप’ला गुगली टाकला आहे. सिद्धू, माजी हॉकीपटू परगटसिंग, अपक्ष उमेदवार सिमरजीतसिंग बैस आणि त्यांचे भाऊ बलविंदरसिंग यांनी एकत्र येऊन पक्षाची स्थापना केली आहे.

 

अकाली दल-भाजपपुढे कडवे आव्हान
सिद्धू यांनी नवा पक्ष स्थापन करून पंजाबमधील सत्ताधारी अकाली दल-भाजप आघाडीपुढे कडवे आव्हान उभे केल्याचे बोलले जाते. अकाली दलाचे कट्टर विरोधक असलेले सिद्धू निवडणूक प्रचारात रंगत आणतील. ‘आप’समोरही आव्हान असणार आहे.
SHARE THIS

RELATED ARTICLES

LEAVE COMMENT