समस्त मालवण परिसरात हाहाकार! सिंधुदुर्गातील समुद्रात बुडून 8 विद्यार्थ्यांचा मृत्यू?

IMG-20170415-WA0207

प्रतिनिधि.

सिंधुदुर्ग  मालवण तालुक्यातील वायरी समुद्र किनाऱ्यावर बुडून ८ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे!

सकाळी ११.३० वाजता घडलेल्या या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

मृतांमधील सर्वजण बेळगावातील मराठा इंजिनिअरिंग कॉलेजचे विद्यार्थी होते.

बेळगावमधील मराठा इंजिनिअरिंग कॉलेजच्या 60 विद्यार्थ्यांचा ग्रुप सहलीसाठी सिंधुदुर्गात आला होता.

त्यावेळी काही विद्यार्थी वायरी समुद्र किनारी पाण्यात उतरले. समुद्राला भरती आल्याने पाण्याचा अंदाज आला नाही आणि त्यामुळे ही दुर्दैवी घटना घडली!

या दुर्घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला आहे, तर संकेत गाडवी, अनिता हानली आणि आकांक्षा घाडगे या तीन जणांना वाचवण्यात यश आले आहे. मात्र, तिघेही गंभीर आहेत?

या दुर्घटनेच्या धक्क्याने शिक्षिका बेशुद्ध पडल्याची माहिती मिळते आहे

घटनेची माहिती मिळताच सिंधुदुर्ग पोलिस वायरी समुद्र किनाऱ्यावर पोहोचले.

त्यानंतर पुढील तपास सुरु करण्यात आला आहे.

मृतांची नावं मुजमीन अनिकेत, किरण खांडेकर, आरती चव्हाण, अवधूत, नितीन मुत्नाडकर, करुणा बेर्डे ,माया कोले आणि प्रा. महेश अशा प्रकारे आहेत.

 

SHARE THIS

RELATED ARTICLES

LEAVE COMMENT