बी ड़ी डी चाल वर्ली प्रकल्प लवकर च भूमि पूजन मुख्य अतिथि कोण

वरळी बी.डी.डी. चाळ प्रकल्पाचे अखेर मंगळवारी भूमिपूजन,
कोण अस्तील मुख्य अतिथि ?

मुंबई :
बी.डी.डी. चाळ प्रकल्प प्रत्यक्ष सुरू होण्यास लागणाऱ्या विलंबापोटी म्हाडाला दरदिवशी तीन कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे.
हा प्रकल्प तात्काळ सुरु करण्याचा प्रयत्न करणाऱ्या म्हाडाच्या प्रयत्नांना अखेर यश आले असून येत्या मंगळवारी (२७ जुलै) वरळी प्रकल्पातील पुनर्वसन इमारतींच्या बांधकामाला सुरूवात होणार आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते प्रकल्पाच्या ठिकाणी भूमिपूजन होणार असल्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.
दक्षिण आशियाई देशांतील हा सर्वात मोठा नागरी पुनर्विकास प्रकल्प असल्याचा दावाही त्यांनी केला.
बी.डी.डी. चाळ प्रकल्पात पुनर्वसन इमारतींचे बांधकाम सुरु करण्यासाठी सर्वांत महत्त्वाचे असलेले
सिटी स्पेस’ या सामाजिक संस्थेचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ मिळाले असून पर्यावरण परवानग्या आमच्याकडे आहेत.
त्यामुळे या प्रकल्पातील पुनर्वसनाच्या इमारतींच्या बांधकामाला सुरुवात करणे सहज शक्य आहे,’
असे मुंबई गृहनिर्माण मंडळाचे मुख्य अधिकारी योगेश म्हसे यांनी सांगितले.
नायगाव व ना. म. जोशी मार्ग प्रकल्प चार वर्षांपूर्वी तर वरळी प्रकल्प दोन वर्षांपूर्वी सुरू झाला आहे.
या प्रकल्पासाठी म्हाडाने
एल. अँड टी., शापुरजी पालनजी व टाटा-कॅपिसिट कन्स्ट्रक्शन कंपनी अशा बड्या विकासकांची कंत्राटदार म्हणून नियुक्ती केली.
नायगाव प्रकल्पाचे अजिबात काम सुरू झालेले नाही
तर ना. म. जोशी मार्ग प्रकल्पात संक्रमण शिबिर बांधण्यात आले आहे.
वरळी येथे संक्रमण शिबिराचे काम सुरू झाले होते.

SHARE THIS

RELATED ARTICLES

LEAVE COMMENT