कंप्यूटर इंजीनियरिंग स्टूडेंट्स बौद्ध युवती वर बलात्कार , क्रूर हत्याकांड पूर्ण बात्मी

कंप्युटर इंजिनियरिंग शिकणाऱ्या बौध्द तरुणीवर बलात्कार करून क्रूरपणे हत्याकांड!

मुंबई चर्चगेट येथील सावित्रीबाई फुले शासकीय वस्तीगृह येथील मानवतेला काळीमा फासणारी आणि महाराष्ट्राला हादरून टाकणारी घटना घडली आहे.

हीना मेश्राम ही बौध्द तरुणी अकोला येथून शिक्षण घेण्यासाठी मुंबईला आली. कॉम्प्युटर इंजिीअरिंगमध्ये बांद्रा पॉलिटेक्निक कॉलेज येते शिक्षण घेत होती. चर्चगेट येतील सावित्रीबाई फुले वसतिगृहात तिचा नंबर लागला होता गेली सहा महिने ती तिथे राहत होती.
दोन दिवसाने ती गावी अकोला जाणार होती, चौथ्या मजल्यावर ती राहत होती.

त्या मजल्यावरील मुली गावी गेल्या होत्या, ती एकटी त्या मजल्यावर होती. तिथे गेटवर असलेल्या सुरक्षारक्षक नराधमाने ती एकटी असल्याचा फायदा घेऊन बलात्कार केला आणि तिची हत्या केली.
मुलींच्या वसतिगृहात तो सहज जा

तो, अतोनात छळ करून तीच हत्याकांड करतो. रात्रभर तिथे हा क्रूर प्रकार घडला तरी सुद्धा कुणाला कळला नाही. रात्री राऊंड ला येणाऱ्या गाड्यांनी सुद्धा येते बाहेर सुरक्षा गार्ड नाही म्हणून चौकशी केली नाही ती केली असती तर ती वाचली असती.

नग्न अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. अतिशय हिंस्त्र पने पाशवी अत्याचार त्याने केले.
त्याच्यावरच सगळ्यांचा संशय होता म्हणून त्याचा शोध सुरू केला तर त्याने आत्महत्या केली आहे.
• प्रश्न हा आहे की, मुलीच्या वसतिगृहात थेट आत सुरक्षा रक्षक कशा काय गेला.

वसतिगृहात सीसीटिव्ही कॅमेरे नाहीत.
महिला वॉर्डन कुठे आहेत की नाही?
या मुलींच्या सुरक्षासाठी कसलीच उपाय योजना नाही.
अतिशय गंभीर आहे, सरकारच्या नाकर्ते धोरणामुळे व बौध्द अनुसूचित जातीच्या गरीब मुलींचे वसतिगृह आहे म्हणून त्यांच्या जीवाची काळजी घेतली नाही का?
या हत्याकांडाला सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार आहे. निर्दयी गेंड्याच्या कातडीची बधीर झालेली ही व्यवस्था आहे.

या मनुष्यवधाला राज्य सरकार जबाबदार आहे. व्यवस्थापकीय मॅनेजमेंट जबाबदार आहे. या हत्याकांडात निष्क्रिय सरकार अधिकारी कर्मचारी यांना आरोपी केले पाहिजे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस उत्तर द्या हा मनुष्यवध कुणी केला.

या घटनेला दडपण्याचा प्रयत्न सुरू असताना, रात्री 3 वाजता ऑल इंडिया पँथर सेना मुबई महिला अध्यक्ष सुषमा शिंदे, Adv. कृष्णा दिवेकर यांनी धाव घेतली. वसतिगृह माहिती देत नाही. तिथे मुलीचे एक नातेवाईक भेटले ते घाबरलेले आहेत. भित भित त्यांनी माहिती दिली. गरीब आई वडील गावाकडून येत आहेत. आपल्या लेकराच्या शरीराचे लक्तरे तोडले आहेत
मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशन येथील हद्दीतील ही घटना आहे!

मुंबईत दलित मुली सुरक्षीत नाहीत, तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे.
पिडीत परिवाराला न्याय मिळाला पाहिजे.
एकनाथ शिंदे यांनी तात्काळ राजीनामा दिलं पाहिजे.
महाराष्ट्र सरकार तात्काळ बरखास्त झालं पाहिजे.
महाराष्ट्र राज्य महिला अत्याचारग्रस्त, दलित अत्याचारग्रस्त घोषित केलाच पाहिजे!

SHARE THIS

RELATED ARTICLES

LEAVE COMMENT