शरद पवार म्हणजे राजकारण आणि विकासाचे विद्यापीठ ?

download (30)

प्रतिनिधि.

सन्मानिय पद्मविभूषण शरद पवार साहेब यांच्या संसदिय कारकिर्दीस ५० वर्ष आणि महाराष्ट्र विधानसभेतील ज्येष्ठ सन्मानिय सदस्य श्री. गणपतराव देशमुख यांच्या संसदिय कारकिर्दीस ५५ वर्ष झाल्याबद्दल आज विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात माननीय मुख्यमंत्र्यांनी अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला.
या प्रस्तावावर चर्चा करताना दोन्ही महनीय व्यक्तींच्या कार्याबद्दल माझे विचार व्यक्त केले.
माननीय शरद पवार यांना अनेकवेळा जवळून पाहायची संधी मला मिळाली.
पवार साहेब कोणत्या रसायनाने बनले आहेत, असा प्रश्न मला नेहमीच पडतो.
त्यांचा दिवस सकाळी ६ वाजता सुरु होतो. सकाळी ८ वाजल्यापासून लोकांच्या भेटीगाठी ते सुरु करतात.
संसदिय कारकिर्दिच्या ५० वर्षांत त्यांनी केलेले काम आणि कर्तुत्व हे राज्यासाठी मार्गदर्शक आहे.
माझ्यामते, शरद पवार हे राजकारण आणि विकासाचे चालते बोलते विद्यापीठच आहेत.
तास दोन तासात बोलून पुर्ण होऊन शकत नाही इतकं अंथाग काम त्यांनी केले आहे.
एवढी गुणवत्ता असलेला माणूस कोणत्याही पक्षात असला तरी तो आपल्या महाराष्ट्राचा आहे, याचा मला अभिमान आहे. जात-पात-धर्म पक्षाच्या बाहेर विचार केला तर या माणसाचा मोठेपण आपल्याला दिसेल.
पवार साहेबांच्या दिल्ली येथे झालेल्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमात माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी त्यांचे कौतुक करताना म्हटले होते की, २००४ साली साहेब गृहमंत्री, सरक्षंण मंत्री होऊ शकले असते पण त्यांनी कृषीमंत्री म्हणून जबाबदारी घेतली आणि दहा वर्षात भारत कृषी क्षेत्रात भरीव प्रगती करु शकला.
केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली एकदा म्हणाले की देशात १०० बारामती झाल्या पाहीजेत.
२००४ पूर्वी या देशात अन्नधान्य आयात केले जायचे.
पण पवार साहेब कृषीमंत्री झाल्यानंतर देशात २६५ दक्षलक्ष टन धान्याचे विक्रमी उत्पादन झाले आहे.
कधीकाळी धान्याची आयत करणारा आपला देश आज धान्याची निर्यात करत आहोत.
आपल्या देशाचा आज दुध-केळी उत्पादनात प्रथम, भाजीपाला उत्पादनात दुसरा आणि मत्सउत्पादनात तीसरा क्रमांक आहे. एक कोटी ६६ लाख लोकांना फलोत्पदनात रोजगार मिळाला आहे.
किसान कॉल सेंटर त्यांनी सुरु केले.
जीडीपीमद्ये शेतीचा वाटा १८ टक्के आहे. कृषी खात्याच्या माध्यमातून देशाला स्वावलंबी करण्याचे श्रेय पवार यांना जाते.
म्हणूनच त्यांच्या अमृतमहोत्सवी सोहळ्याला चौदा मुख्यमंत्री, आजी माजी पंतप्रधान, राष्ट्रपती, उप राष्ट्रपती हजर होते. डोळ्याचे पारणे फेडणारा हा सोहळा ठरला.
संसदिय कार्यपद्धतीचे पुर्ण पालन, शिस्तीचे अनुकरण पवारांकडून शिकायला हवे. संसार कसा करावा, कौटुंबिक जिव्हाळा कसा जपावा, मैत्री कशी करावी आणि जपावी हेही त्यांच्याकडून शिकावे.
मी मुख्यमंत्री असताना महापौर रमेश प्रभू आम्ही एका कार्यक्रमानिमित्त भेटलो होतो. तिथे पवार साहेबदेखील आले होते.
कार्यक्रम झाल्यानंतर पवार साहेबांनी प्रभूच्या खांद्यावर हात टाकून पुढे गेले आणि त्यांच्या मुलाच्या अपघाताची चौकशी केली.
काही मदत लागल्यास मला बिनधास्त सांग असे आश्वस्त केले.
कोण करतो असे? पवार काँग्रेसचे, प्रभू शिवसेनेचे.
पण पक्षीय भेद बाजुला ठेवत मदतीला धावणारे फक्त पवारच.
आदर्श लोकशाही परंपरा शरद पवारांनी राखली आणि आम्हाला शिकवली.
आज त्यांचा गौरव करायला आम्हाल मिळतोय ही अभिमानास्पद गोष्ट आहे.
सहकार क्षेत्रात पवार यांनी मोठे योगदान दिलेले आहे. ऊस, कापूस यांच्या नवीन जाती आणण्याच्या मागे पवार साहेब आहेत.
शेतीचे जाण असणारे, शेती तज्ज्ञ, शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी अखंड काम करणारे एकमेव नेते म्हणजे पवार साहेब..
आज स्थानिक स्वराज संस्थामध्ये महिलांना ५० टक्के आरक्षण आहे ते त्यांच्यामुळेच. महिला सबलीकरणाची सुरुवात त्यांनीच केली.
जगात इतके ज्ञान आहे की जन्म-मृत्यू पर्यंत ते आत्मसात नाही करता येणार.
पवार साहेबांनी आपल्या राजकीय जीवनात अनेक धाडस दाखवले त्यामुळेच ते जीवनात यशस्वी झाले.
मी विरोधी पक्षनेता असताना दुष्काळी दौऱ्यावर गेलो होतो. पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आले होते.
पवार साहेबांनी वाजपेयींच्या समोला मला बोलायला संधी दिली होती.
या देशात आज चे मोठे नेते झाले त्यांच्या पंक्तीत पवार साहेबांचे नाव आवर्जुन घ्यायला हवे.
साहित्य क्षेत्राततही पवार साहेबांचे नाव तितकेच आदराने घेतले जाते.
पवार साहेबांना हातात कागद, फाईल किंवा पुस्तकांशिवाय कुणीच पाहिलेले नाही. विमानात बसले तरी ते पुस्तक घेऊन जातात.
वाचनातून आधुनिक व्हावे, तंत्रज्ञान आत्मसात करावे, हा ध्यास आजही ते जपतात.
स्वामिनाथन समिती त्यांनीच गठित केली होती.
महाराष्ट्रातले एकमेव असे नेते ज्यांनी क्रिकेट क्षेत्रात भरीव कामगिरी केलेली आहे. साहेबांच्या अनेक कामांचे आजही देशपातळीवर अनुकरण केले जाते.
लातुर भुकंपाचे आपत्ती व्यवस्थापन त्याचे उत्तम उदाहरण.
गुजरातमध्ये जेव्हा भुंकप झाला, तेव्हा पवार साहेब विरोधी पक्षात होते तरीही पंतप्रधान वाजपेयींनी पवार साहेबांवर आपत्ती व्यवस्थापनाची जबाबदारी सोपवली.
” जिथे पिकले जाते, तिथे विकले जात नाही”, ही म्हण महाराष्ट्राबाबत तंतोतंत लागू होते.
ज्याच्यात गुणवत्ता आहे त्याच्या मागे उभे राहायला पाहिजे, असे महाराष्ट्रात कधी घडले नाही
. या देशाच्या, राज्याच्या प्रगतीमध्ये सिंहाचा वाटा शरद पवार यांचा आहे.
कोकणात आले की पवार साहेब ऊस, सोयाबिन बद्दल बोलत नाहीत तर आंब्याबद्दल बोलतात.
सर्वसामान्य, दुबळ्या लोकांबद्दल विचार कोण करतं तर एकमेव पवारसाहेब.
५० वर्षात १४ वेळा ते निवडूण आले.
ते नुसते निवडूण येत नाहीत तर मोठ्या फरकाने विजय मिळवतात.
निवडणूकीत एक दिवस आधी जाऊन ते फक्त एक सभा घेतात.
तरिही ते लागोपाठ १४ वेळा निवडूण आले.
पवार साहेबांनी ५५ वर्षात विविध क्षेत्रासाठी जे योगदान दिले, ते क्वचितच इतर व्यक्ती देऊ शकेल.
राजकीय मतभेद असले तरी पवार साहेबांचे कर्तृत्व कुणीही नाकारू शकत नाही.
मी शासनाचा आभारी आहे की पवारांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव आणला गेला. आदर्श प्रतिनिधी व्हायचे असेल.
आपल्या विभागाचा विकास करायचा असेल तर पवार साहेबांना जाणून घ्यावेच लागेल.
माझे आवडते नेते कोण विचाराल तर मी सांगेन, ते बाळासाहेब ठाकरे आहेत.
पण मला विचाराल राजकारणातला आवडता नेता कोण तर ते शरद पवार आहेत.
बाळासाहेब ठाकरे आणि पवार साहेब मित्र होते
. पण जेव्हा राजकारणाचा विषय यायचा तेव्हा बाळासाहेब त्यांचे कार्टुन काढण्यापासून थांबले नाहीत.
मला प्रतिभा ताईंचा उल्लेख करावासा वाटतो.
साहेबांचा आज जो गौरव होतोय त्यात प्रतिभाताईंचे योगदान महत्त्वाचे आहे.
साहेबांचे वडिल गोविंदराव आणि आई शारदाबाई यांचेही आभार व्यक्त करायला हवेत.
शेतकरी आर्थिक सबळ जेव्हा होईल तेव्हा साहेबांच्या ५० वर्षांच्या कामाचे सार्थक होईल.
माझ्या कुलदैवत रामेश्वराकडे प्रार्थना करुन साहेबांना उंदड आयुष्य आणि उत्तम आरोग्य लाभो अशी प्रार्थना रुपी गाऱ्हाने मांडतो.

SHARE THIS

RELATED ARTICLES

LEAVE COMMENT