पुणे ईथे महाराष्ट्र संदेश न्यूज चे मार्फत वर्दी चा सम्मान अंतर्गत पोलिसा चा सत्कार समारोह संपन्न
पुणे येथे महाराष्ट्र संदेश न्युजच्या वतीने सन्मान वर्दीचा सन्मान वर्दीतील माणसाचा कार्यक्रमा अंतर्गत पोलिसांचा सत्कार समारोह संपन्न.
पुणे:- महाराष्ट्र संदेश न्युज पुणे जिल्हा टीमच्या वतीने सन्मान वर्दीचा सन्मान वर्दीतील माणसाचा कार्यक्रमा पुणे शहरातील शिवाजी नगर पोलीस स्टेशनच्या पोलीस कर्मचाऱ्यांचा सन्मान समारोहाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अरविंद माने यांनी केलं. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र संदेश न्युजचे मुख्यसंपादक प्रशांत जगताप हे होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. संजय खोब्रागडे रायगड, सीमाताई सुरोशे, सामाजिक कार्यकर्त्या वाशिम, सारिका शिंदे सामाजिक कार्यकर्त्या मुंबई, रुपाली निंबाळकर लेखिका सह अनेक मान्यवर उपस्थित या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि या कार्यकर्माचा हेतू मुख्यसंपादक प्रशांत जगताप यांनी केले यावेळी बोलताना प्रशांत जगताप म्हणाले की, आज आपण दिवसरात्र कर्तव्यावर असलेल्या पोलिसांमुळे सामान्य नागरिक सुरक्षित असतात. त्यात गुन्हाची उकल करून गुन्हेगारांवर वचप ठेऊन सामाजिक सुरक्षा हे महत्वपूर्ण ध्येय नेहमी पोलिसांचे असते. आपले कुटुंब सांभाळून देशासाठी खाकी वर्दी परिधान करून नागरिकांचे रक्षण करणार्या पोलिसांचा महाराष्ट्र संदेश न्युजच्या वतीने सत्कार व सन्मान करण्यात येत आहे.
यावेळी डॉ. संजय खोब्रागडे यांनी महत्वपूर्ण मार्गदर्शन केलं. संविधानातून नागरिकांना मिळालेले मूलभूत हक्क आणि अधिकार अबाधित राखण्यासाठी पोलिसांची भूमिका खूप महत्वपूर्ण असते. पोलिसांनमुळे आपण सुरक्षित आहोत. महाराष्ट्र संदेश न्युज तर्फे आयोजीत पोलीसांचा सन्मान करून त्यांचा सत्कार ही अभिनंदनीय बाब आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या देवदासी व निराधार संघटनेच्या सरिकाताई शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
महाराष्ट्र संदेश न्युजच्या वतीने सन्मान वर्दीचा सन्मान वर्दीतील माणसाचा या उपक्रमअंतर्गत पुणे शहरातील शिवाजी नगर पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या पोलीसांचा सन्मान समारोह आयोजित करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र संदेश न्युजचे पुणे ब्यूरो चीफ पंकेश जाधव व पुणे जील्हातील महाराष्ट्र संदेश न्युजचे प्रतिनिधी बालाजी शिंदे, दैनियल अँथोनी, आसमा सय्यद, अभिजित थोरात, सनी जोसेफ, कूनाल घोडके, स्नेहल ससाने, सौरव वाघमारे, उपसंपादक वैशाली गायकवाड या महाराष्ट्र संदेश न्युजच्या प्रतिनिधी टीमने आनंदमय वातावरणात पोलिसांचा सन्मान आणि सत्कार केला.
यावेळी शिवाजी नगर पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने, विक्रम गौड पोलीस निरीक्षक गुन्हे, बाजीराव नाईक साहाय्यक पोलीस निरीक्षक, मनीषा जाधव, पोलीस उपनिरीक्षक, रुपेश वाघमारे पोलीस हवालदार, आदेश चलवादी पोलीस हवालदार, रुचिका जमदाडे पोलीस शिपाई यांचा सन्मान करण्यात आला.
आज पोलिस आपल्या देशाची सेवा करतात म्हणून आपण आपल्या घरामध्ये सुरक्षित राहतो. म्हणून आपल्या जीवनात पोलिसांना खूप महत्त्वाचे स्थान आहे. देशाची आणि समाजाची सुरक्षा आणि देशाच्या शांततेसाठी पोलिसांची सेवा खूप आवश्यक आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे तसेच मालमत्तेची रक्षणाची जबाबदारी पोलिसांवर सोपवलेली असते. ”जसे सैनिक सीमेवर राहून विदेशी शत्रूपासून आपल्या देशाचे रक्षण करतात, त्याचप्रमाणे पोलिस राष्ट्रातील सर्व अडचणी सोडवण्यात आपली मदत करतात. कुठेही भांडण-तंटा झाला तर पोलीस तत्पर उभे राहतात. पोलिस 24 तास आपली सेवा करण्यात मग्न असतात. त्यामुळे पोलीस आपल्या समाजाचा अविभाज्य घटक आहे. महाराष्ट्र संदेश न्युजला आपल्या राज्यातील पोलिसांवर अभिमान आहे.
एडमिन