पाहा महाराष्ट्रातील 49 टक्के महिला क़ाय म्हणतात की पतीने मारहाण केल्यास काही गैर नाही !
रिपोर्टर.
राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्व्हेक्षण 2015-16 मधून घरगुती हिंसाचारासंबंधी एक धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.
हा आकडा त्या महिलांचा आहे ज्यांना पतीने पत्नीला मारहाण करणं चुकीचं वाटत नाही.
सर्व्हेक्षणात सहभागी जवळपास 49 टक्के महिलांनी मारहाणीत काहीही गैर नसल्याचं सांगितलं आहे.
या महिलांचं म्हणणं आहे की, जर पत्नीने पतीचं ऐकलं नाही तर मारहाण होणं साहजिक आहे.
सर्व्हेक्षणात सहभागी झालेल्या या महिलांनी सांगितलं आहे की, ‘जर पती घरातील कामं न केल्यामुळे, मुलांवर व्यवस्थित लक्ष ने ठेवल्यामुळे किंवा शारिरीक संबंध ठेवण्यास नकार दिल्यामुळे मारहाण करत असेल तर त्यात काही चुकीचं नाही’.
सर्व्हेक्षणात सहभागी एकूण 3672 महिलांपैकी जवळपास 75 टक्के महिलांनी दारु प्यायल्यानंतर पती रागाच्या भरात हात उचलत असल्याची माहिती दिली आहे.
फक्त 16 महिलांनी आपला पती फक्त चहा पित असल्याचं सांगितलं आहे, पण तरीही ते मारहाण करतात.
जवळपास 20 टक्के महिलांनी आपला पती कानाखाली मारत असल्याची माहिती दिली आहे.
मानसोपचारतज्ञ डॉ अदिती आचार्य यांनी म्हटलं आहे की, ‘अनेक महिला आपल्या पतीवर अवलंबून असल्या कारणाने विरोधात जाण्याचं पाऊल उचलत नाहीत.
इतकंच नाही तर सासरच्या बाजूला जाताच महिलांचा दृष्टीकोन बदलतो.
स्वत: घरगुती हिंसाचार पीडित असतानाही अनेकदा आपल्या मुलाकडून सुनेला मारहाण होत असताना त्या विरोध करत नाहीत’.