तरूणीवर २ मित्रांचा सामुहीक बलात्कार खुन करून प्रेत बॅगेतून फेकले २ जण अटकेत !

images (93)

प्रतिनिधि.

मुम्बई च्या जवळच ठाणे येथे कामाला असलेल्या तरूणीला अंबरनाथ पुर्व येथिल पालेगाव परिसरात तिच्या मित्रासह त्याच्या जोडीदाराने सामुहिक अत्याचार करून ती या घटनेबाबत पोलिस ठाण्यात तक्रार करेल या भीतीने तिला जीवेठार मारून तिचे प्रेत बॅगेत भरून बेळगावच्या हद्दीत फेकून दिले ?

पण गुन्हयात ती चार चाकी गाडी वापरली होती त्या गाडीवरील चालकामुळे हा खुनाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने त्या २ तरूणांना रत्नागीरी पोलिसांनी अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनूसार मुळ नागपूर येथे राहणारी अंकिता(२२) ही तरूणी मुंबई येथील विक्रोळी परिसरात कामाला होती .

त्याठिकाणी राहत होती. नागपुर येथील चिखली परिसरात राहणारा निकलेश पाटील(२४) हा तिचा मित्र असल्याने २ दिवसांपुर्वी तिला भेटण्यासाठी मुंबई येथे आला.
निकलेश याचा मित्र अक्षय वालोदे(२५) हा मुळ नागपुर येथला राहणारा असून तो सद्या अंबरनाथ पुर्व येथिल पालेगाव परिसरात स्किवेअर हाईडस् या ठिकाणी रूम नं. २०३ मध्ये राहतो.

निकलेश याने त्याचा नागपुर येथील मित्र निलेश याला आपल्या सोबत घेऊन त्याची चार चाकी गाडी घेऊन तो मुंबई येथे अंकिता हिला भेटायला गेला होता.
तिला फिरायला नेण्याचा बहाणा करीत त्याने त्या गाडीतून तीला मित्र अक्षय याच्या रूमवर पालेगाव येथे आणले.
त्याठिकाणी त्या निकलेश व अक्षय या दोघांनी

आळीपाळीने अंकिता हिच्यावर पाशवी बलात्कार केला.
हा प्रकार घडल्यावर तिने त्या दोघांना आपण पोलिस ठाण्यात तक्रार करू असा दम दिला.
तिने या घटनेबाबत कुठे वंचता करू नये म्हणून त्या दोघांनी तिचे तोंड दाबुन तिला जीवेठार मारले .

पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने तिचे प्रेत बॅगेत भरून ती बॅग सोबत आणलेला मित्र निलेश याच्या गाडीत ठेवली.
त्या दोघांनी जे कृत्य केले होते त्याची कल्पना निलेश याला नव्हती.

वाटेत कोल्हापुरच्या पुढे ती बॅग त्या दोघांनी निलेश याच्या नकळत फेकून दिली.
गाडीत असलेलया बॅगेबाबत निलेश यांनी त्या दोघांकडे विचारपुस केल्यावर ते खुपच घाबरले.
त्या दोघांनी काहीतरी भयानक प्रकार केले असल्याचे निलेश याला संशय येताच त्याने त्या दोघांकडे चौकशी केल्यावर त्यांच्या हातून अंकिता हिचा खुन झाले असल्याचे त्यांनी सांगितले!

याशिवाय आपण केलेले कृत्य उघडकीस येईल व पोलिस आपल्या पकडतील या भीतीने निकलेश व अक्षय या दोघांनी रत्नागीरी पोलिस ठाण्यात जाऊन पोलिसांच्या स्वाधिन झाले.

पोलिसांनी त्या दोघांना ताब्यात घेऊन निलेश याने दिलेल्या फिर्यादीवरून रत्नागीरी पोलिस ठाण्यात प्रथम झिरो नंबरने निकलेश पाटील व अक्षय वालोदे या २ जणांविरूध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली.

याशिवाय बेळगाव परिसरात बॅगेतून फेकलेला अंकिता हिचा मृतदेह पोलिसांना मिळून आला आहे.
हा खुनाचा प्रकार अंबरनाथ येथील शिवाजी नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने तो खुनाचा गुन्हा शिवाजीनगर पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.

ज्याठिकाणी अंकिता हिची हत्या करण्यात आली होती त्याठिकाणील बुधवारी सकाळी पोलिस उपायुक्त अंकित गोयल, स.पो.आयुक्त सुनिल पाटील, व.पो.नि.दिलीप गोडबोले, पो.उप.नि.गोसावी यांनी जाऊन पाहणी केली.

अंबरनाथ मधील शिवाजीनगर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून त्यांच्याकडे या खुनाच्या गुन्हयासंदर्भात अधिक चौकशी पोलिस करीत आहेत !

SHARE THIS

RELATED ARTICLES

LEAVE COMMENT