जापान कडून फुकटात दिलेली फ्री गिफ्ट बुलेट ट्रैन देशाला कितपत फायदा व नुकसान देणारी आहे हे मोदीजिनी खर तथ्य देशाला सांगावे ?

images (100)

रिपोर्टर.

१०००० कोटी रुपयांच्या बुलेट ट्रेनच्या प्रोजेक्ट कॉस्ट पैकी ८८००० कोटी ०.१ टक्के दराने ५० वर्षांच्या दीर्घ मुदतीच्या जपानने देऊ केलेल्या कर्जामुळे, महाराष्ट्र सरकारच्या २००००कोटीच्या सहभागामुळे बुलेट ट्रेन देशाला फुकटात मिळाली, जपानकडून भारताला मिळत असलेली ही फ्री गिफ्ट आहे हे पंतप्रधान मोदीजींचं म्हणणं कितपत योग्य ?

भारतातले समस्त अर्थतज्ज्ञ ह्याचं विवरण देऊ शकतील का?

८८०००कोटीच्या ०.१% म्हणजे ८८० कोटी वर्षाला नुसतं व्याज भराव लागणार ! बाकी मुदलाचं काय ?
बुलेट ट्रेनचा प्रवास वन वे तीन तासाचा म्हणजे क्षणभरही थांबायचं नाही ठरवलं तर जास्तीत जास्त दिवसातनं ८ फे-या एक १० डब्याची गाडी करणार.

गाडीत फक्त ७५० जागा दोन्ही वेळेला फुल्ल पॅक्ड गेली तर एका फेरीत १५०० प्रवासी प्रवास करू शकतील!
एका दिवसात कमाल १२००० प्रवासी प्रवास करू शकतील !
अशा रोज दोन गाड्या मुंबई अहमदाबाद दरम्यान चालवल्या तर कमाल २४००० प्रवासी प्रवास करतील !
सरकारचा दावा रोज ३६ हजार प्रवासी प्रवास करतील !

तिकिट ₹२७०० ते ₹३००० असणार म्हणजे सरकारच्या दाव्यानुसार रोज १०.८ कोटीचा गल्ला जमणार !
एका वर्षात निदान ३६५०कोटी रूपये बुलेट ट्रेन वर्षाकाठी मिळवणार !

वर्षाचं व्याज ₹८०० कोटी फेडून वर २८५० कोटी बुलेट मिळवणार. यात भारत सरकारला काय मिळणार?
ठाऊक नाही ! केन्द्र सरकारचा सहभाग याची माहिती नाही.

ज्या गुजरातेत सर्वात जास्त स्टेशन्स असणार त्याच्या सहभागाबद्दल काही माहिती नाही !
महीराष्ट्रात फक्त वांद्रे, ठाणे विरार आणि बोईसर या ४ स्थानकांसाठी महाराष्ट्राचा २०००० कोटीचा सहभाग .
सगळी प्रोजेक्ट कॉस्ट जर १.१ लाख कोटी तर गुजरात काय २ हजार कोटीत ८ स्टेशन्स मिळवणार ?

मोदी बहुधा गुजरातच्या दृष्टिकोनातून बुलेट ट्रेन फुकट मिळतेय हे विधान करू धजले !
अवघ्या दोन हजार कोटी गुंतवणुकीतून गुजरातला बुलेट ट्रेन मिळणार !
फायदा सगळे गुजराती उचलणार आणि महाराष्ट्र स्वस्थपणे बघत बसणार !

ही मोदींची गुजरातसाठीची चलाखी की त्याच्या कल्पना-
विक्रीकौशल्याची महाराष्ट्राला मोजावी लागणारी किंमत ?
हळूहळू मेत इन इंडियाचा अर्थ महाराष्ट्राला कळायला लागेल !
मोदीजी भारताचे पंतप्रधान आहेत की व्हायब्रंट गुजरातचं मार्केटिंग करणारे गुजरातचे मुख्यमंत्री !
वाचा आणि विचार करा !

SHARE THIS

RELATED ARTICLES

LEAVE COMMENT