खुद्द कांग्रेस पार्टी चे कांग्रेसी ज्येष्ठ नेता मणिशंकर अय्यर यांची काढली अंत्ययात्रा?

images(54)

प्रतिनिधी.

नागपूर : ‘ज्येष्ठ काँग्रेस नेते ‘ मणिशंकर अय्यर यांनी ‘भारतापेक्षा पाकिस्तानात अधिक सुरक्षित वाटते’,

असे वक्तव्य करून पुन्हा एकदा आगीत तेल ओतले आहे.
त्यांचे हे वक्तव्य पाकिस्तानधार्जिणे असून, देशद्रोहीपणा आहे. हा वाचाळवीर काँग्रेसचा असला तरी ते शोभनीय नाही’,

असा संताप व्यक्त करीत नागपुरात युवक काँग्रेसने त्यांची अंत्ययात्रा काढून काँग्रेसला घरचा आहेर दिला.

जुना बगडगंज, कापसे चौक येथे प्रारंभी निषेध सभा घेण्यात आली. त्यानंतर त्यांच्या प्रतिमेला काळे फासत,
चपला-जोड्यांनी मारण्यात आले. त्यानंतर अंत्ययात्रा गंगाबाई घाटापर्यंत काढण्यात आली.
यावेळी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते व पोलिस यांच्यात शाब्दिक चकमकही उडाली.

पूर्व नागपूर युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष अक्षय घाटोळे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.
अय्यर यांनी ‘मला भारतापेक्षा पाकिस्तान सुरक्षित वाटते’ या शब्दांत पाकिस्तानचे गोडवे गायले.

त्यांना पाकिस्तानचा एवढाच पुळका आला तर त्यांनी खुशालपणे पाकिस्तानात वास्तव्यास जावे. आज जो तो देशद्रोही वक्तव्य करीत सुटला आहे.
मणिशंकर अय्यर हे काँग्रेसमध्ये होते तेव्हाही असे बरळत होते.

देशाच्या विरुद्ध जो कोणी बोलेल, तो कोणत्याही पक्षाचा असो, त्यांच्याविरुद्ध युवक काँग्रेस निषेधाचे आंदोलन करणार आहे. प्रथम देश, नंतर पक्ष येतो.
मणिशंकर अय्यर यांनी देशाची माफी मागावी व आपले शब्द मागे घ्यावे,
अन्यथा युवक काँग्रेस निषेधार्थ कार्यक्रम सुरूच ठेवेल, असा इशाराही यावेळी देण्यात आला !

SHARE THIS

RELATED ARTICLES

LEAVE COMMENT