खरोखर पेटिएम ऑनलाईन म्हणजे लुटीचा उत्तम नमुना !

images (11)

प्रतिनिधी.
काल कुटुंबियांसोबत सिनेमाला जायचे ठरवले आणि पेटीएमवरून ऑनलाईन बुकिंग करायला घेतले.
सिनेमा, वेळ, सीट्स इत्यादी तपशील ठरवला.
एका तिकीटाची किंमत होती १८० रुपये म्हणजे ५ तिकिटांचे ९०० रुपये झाले.

पैसे भरताना पुढे मेसेज दिसला Proceed to Pay ११२६. तिकिटाचे ९०० रुपये असताना २२६ रुपये जास्त का पे करायला सांगताय .
हे कळले नाही म्हणून थोडं बारकाईने बघितले तर तिथे एक हिडन माहिती दिसली.

त्यात कन्विनिएंस फी १०६ रुपये तर कॅन्सलेशन प्रोटेक्ट चार्जेस १२० रुपये असे मिळून एकूण ११२६ रुपये भरायला सांगितले जात होते. (यापैकी कॅन्सलेशन प्रोटेक्ट हा भाग आॅप्शनल असला तरी तो सहजगत्या कळणार नाही अशा चलाखीने by defalt टाकण्यात आला होता) मग पेटीएम ऍप बंद केले आणि तिकीट काउंटरवर जाऊन ९०० रुपये रोख देऊन तिकीट काढले.
तर सांगायचं मुद्दा हा कि एका बाजूला कॅशलेस इंडियाचे नारे दिले जात आहेत.

मी स्वतःही गेले काही महिने डिजिटल लिटरसी ही लेखमाला सकाळमध्ये लिहून कॅशलेस व्यवहारांना चालना मिळेल यासाठी प्रयत्नशील आहे.

अशा परिस्थितीत दुसऱ्या बाजूला ऑनलाईन पेमेंटच्या नावाखाली पेटीएम सारखी कंपनी ९०० रुपयांमागे २२६ रुपये चार्जेस घेते आहे ही ऑनलाईन लूटच आहे.
अलीकडे बँकांनीही वाट्टेल तसे चार्जेस लावायला सुरुवात केल्याच्या बातम्या वाचायला मिळत आहेत.

असेच चालत राहिले आणि छोट्या छोट्या व्यवहारांसाठी अशी लुटारुगिरी होत राहिली तर कोण या फंदात पडेल ?
याकडे शासनाने वेळीच लक्ष न दिल्यास सर्व सामान्यांचा या ऑनलाईन साधनांवरचा विश्वासच उडून जाईल.

कॅशलेस व्यवहार करा असे आजवर अनेक लेखांमधून सांगत असताना कॅशलेस व्यवहार जपून करा हे सांगायची वेळ यावी हे खरोखर दुर्दैवी आहे.

हा अनुभव सोशल मीडियावर पोस्ट करून संबंधित यंत्रंणांना फारसा फरक पडणार नाही याची मला कल्पना आहे.

पण ऑनलाईन पेमेंट्स करताना खरी किंमत किती आणि Proceed to Pay म्हणताना विविध चार्जेसच्या नावाखाली किती रक्कम मागितली जात आहे
याची काळजी घेतली तरी या पोस्टचा फायदा हजारो ऑनलाईन पेमेंट कर्त्यांना होऊ शकेल.

म्हणूनच जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचल्यास पेटीएम सारख्या कंपन्यांना असे जिजिया शुल्क बंद करावे लागेल किंवा आपण तरी काळजी घेवू.

SHARE THIS

RELATED ARTICLES

LEAVE COMMENT