केवड्ढ़े हे क्रोर्य?अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करुन जिवंत जाळले !
प्रतिनिधी.
(रांची) :- गेल्या काही दिवसांपासून बलात्काराच्या घटनांनी सर्वत्र देश हादरलेला असतानाच अशीच एक घटना समोर आली आहे.
या घटनेतील नराधमांचे क्रौर्य ऐकून आपल्या जिवाचा थरकाप उडाल्याशिवाय राहणार नाही.
झारखंड येथील चतरा या जिल्ह्यात एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला.
पीडित मुलीसोबत काय झाले आहे हे समजताच गावातील पंचांनी या घटनेतील दोषींना प्रत्येकी ५० हजारांचा दंड ठोठावला.
दंड ठोठावल्याचा राग मनात धरून हे नराधम पीडित मुलीच्या घरी गेले.
तिथे तिच्या घरात बळजबरीने घुसले आणि तिला जाळून ठार केले.
पीडित मुलगी ८ वीत शिकत होती अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
छतरा या ठिकाणच्या राजा केंदुआ गावात ही भयानक , विचित्र , व दुखद घटना घडली.
मात्र या सगळ्या घटनेनंतर जो दंड ठोठावण्यात आला त्याचा राग मनात ठेवून या नराधमांनी या मुलीच्या घरात घुसून तिला जिवंत जाळले.
तसेच तिच्या आई वडिलांनाही मारहाण केली.
पीडित मुलगी आपल्या चुलत बहिणीच्या लग्नासाठी गेली होती.
तिथून आपल्या घरी परतत असतानाच तिच्यावर पाच जणांनी बलात्कार केला.
त्यानंतर रात्री ११ च्या सुमारास ही मुलगी रडत 2 घरी आली आणि तिने आपल्या आई वडिलांना सगळा प्रकार सांगितला.
पीडित मुलीच्या आई वडिलांनी पंचायतीत दाद मागितली.
शुक्रवारी पंचांनी पंचायत बोलावली आणि सगळ्या नराधमांना प्रत्येकी ५० हजारांचा दंड ठोठावला.
हाच राग मनात धरून या नराधमांनी पीडित मुलीला जिवंत जाळले.
पोलिसांना या प्रकरणाची माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहचले.
पीडित मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. तर नराधमांना अटक करण्यात आली आहे.