एक अति अद्भुत कुट्ठे आकाशातून पडला आठ फुट लांबीचा बर्फाचा गोळा ? पाहा !

नगर – श्रीरामपूर तालुक्यातील माळवाडगाव भागात काल एक किलोमीटर अंतरावर शरद तुकाराम शेरकर यांच्या मालकीच्या गट क्रमांक ६५ मधील शेतात निसर्गाचा अद्भूत चमत्कार पाहायला मिळाला.
शेतकरी, शेतमजूर, महिला शेतीकामात गुंतले असताना विमान अथवा हेलिकॉप्टर धावपट्टीवर उतरावे त्याप्रमाणे आवाज झाला.
तितक्यात आकाशातून सात ते आठ फुट लांबीची बर्फाचा मोठा गोळा शेतात पडला!
आकाशातून दगड खाली टाकावा तसा नाही तर विमान धावपट्टीवर उतरावे त्याप्रमाणे मोठा गोळा कोसळला!
आवाजाने लोक सावध झाल्याने जीवितहानी टळली.
सात ते आठ फुट लांबीची हा गोळा जमिनीवर कोसळताच मातीत एक फुटाचा खड्डा पडून बर्फाच्या गोळ्याचे तुकडे झाले.
बर्फाचे वजन मात्र हलके होते. मात्र बर्फ चिवट व पक्का असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
अनेकांनी तुकडे इतरांना दाखवण्यासाठी घेऊन नेले.
भाऊसाहेब काळे यांनी वैज्ञानिकांना दाखवण्यासाठी अर्धा किलो वजनाचे तुकडे फ्रीजमध्ये ठेवले.
हे वृत्त गावात वाऱ्यायासारखे पसरताच बघ्यांची गर्दी झाली होती.