एकदा फटका बसला या पूढ़े सावध रहा,गाफिल राहु नका

मुंबई

प्रतिनिधि

एकदा फटका बसला आता गाफीलपणा नको

महायुतीचा मेळाव्यात शिंदेंचा युतीच्या कार्यकर्त्यांना कानमंत्र..

‘एकदा फटका बसला आता गाफीलपणा नको’ असा कानमंत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेसह महायुतीच्या सर्वच कार्यकर्त्यांना दिला आहे.

तसेच यावेळी शिंदेंनी हेलिकॉप्टर प्रवासावरून उद्धव ठाकरे यांना देखील टोला लगावला आहे. मुंबईत शनिवारी (6 जून) महायुतीचा मेळावा संपन्न झाला. या मेळाव्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यासह महायुतीचे नेते उपस्थित होते. त्यावेळी शिंदे बोलत होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की,.

गाफील राहू नका एकदा आपल्याला मार बसला आहे. आता आपल्याला ताक देखील फुंकून प्यायचं आहे. कारण आपण एवढी काम केली आहेत. तरी देखील आपल्याला फटका बसला आहे. तसेच यावेळी शिंदेंनी हेलिकॉप्टर प्रवासावरून उद्धव ठाकरे यांना देखील टोला लगावला आहे. ते म्हणाले की, मी हेलिकॉप्टरने शेती करायला जातो. त्यावरून माझ्यावर टीका केली जाते. मग मी 10 तास गाडी चालवत जाऊ का? तेवढ्या वेळात मी 10 हजार फाईल्सवर सह्या करेल. तसेच मी मुख्यमंत्री सहायता निधीला तुम्ही केवळ 2 कोटी दिले होते. मी मात्र त्यासाठी अडीचशे कोटी दिले आहेत. असं देखील शिंदे म्हणाले.

फडणवीसांनी महायुतीच्या प्रवक्यांना फटकारलं..

या कार्यक्रमामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देखील एकमेकांबद्दल केली जाणारी वादग्रस्त विधानं यावरून महायुतीच्या प्रवक्यांना फटकारलं ते म्हणाले की, आज आपलाच एकमेकांत विसंवाद दिसतो. आज आपलेच प्रवक्ते एकमेकांविरुद्ध बोलत आहेत. जर कुणाला बोलायची खुमखुमी असेल तर त्याने आपआपल्या नेत्यांना अगोदर विचारावं. त्यांच्या नेत्यांनी होकार दिला तर आपली खुमखुमी पूर्ण करावी, अशा शब्दात फडणवीसांनी फटकारलं.

दरम्यान सध्या लोकसभा निडणुकीचा निकाल लागल्यापासून महायुतीतील घटक पक्षांतील नेत्यांमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचं चित्र आहे. अजित पवार गटातील नेते आणि भाजप नेत्यामध्ये सातत्याने शाब्दीक चकमकी होत असतात. त्यामुळेच आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी महायुतीच्या सर्वच प्रवक्तांना फटकारलं आहे.

साभार;आबा खवनेकर

SHARE THIS

RELATED ARTICLES

LEAVE COMMENT