आज पहाटे मुम्बई नागपुर दूरंतो एक्सप्रेस रेलवे ला का घडला अपघात ?

IMG-20170829-WA0308

नागपुर: प्रतिनिधि.

मुंबई-नागपूर दुरांतो एक्स्प्रेसचे ४ डबे घसरले, ‘मरे’ विस्कळीत नागपूरहून मुंबईकडे येणाऱ्या दुरांतो एक्स्प्रेसचे इंजिनासह ६ डबे आसनगाव-वासिंद या रेल्वे स्थानकांदरम्यान घसरले.

मंगळवारी पहाटे ६:३५ च्या सुमारास ही घटना घडली.
त्यानंतर या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली असून डबे हटवण्याचे काम सुरु करण्यासाठी कल्याणहून कर्मचारी रवाना करण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

प्रवासी साखर झोपेत असताना अचानक मोठा आवाज झाला आणि सगळेजण बर्थवरून खाली पडले.
जेव्हा प्रवासी बाहेर आले तेव्हा त्यांना इंजिन आणि त्याला लागून असलेले काही डबे रेल्वे रूळावरुन घसरलेले दिसले.

रेल्वे रुळ पूर्णपणे तुटलेले होते आणि वीज पुरवठा करणारी ‘ओव्हरहेड वायर’ देखील तुटली होती.
हे दृश्य इतकं भयानक होतं की प्रत्येकाच्या मनात हाच विचार आला की फक्त गणपती बाप्पाच्या कृपेने आपण बचावलो.

जवळपास २ तास उलटून गेल्यानंतरही इथल्या प्रवाशांना रेल्वे प्रशासनाकडून मदत मिळाली नव्हती असं या ट्रेनने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी सांगितलं आहे.
आसनगांव भागात तुफान पाऊस सुरू असून या प्रवाशांना पावसात भिजत मदत मिळवण्यासाठी प्रयत्न करावे लागतआहेत.

या अपघातात जीवितहानी झालेली नाही, मात्र काही लोक किरकोळ जखमी झाल्याचे कळते आहे. स्थानिक लोक आणि रेल्वे पोलीस मदत करत आहेत.

सततच्या पावसामुळे रेल्वे रुळाखालील खडी वाहून गेल्याने हा अपघात घडल्याचे कळते.
प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार जिथे ही दुर्घटना घडली तिथे रूळावर मोठ्या प्रमाणात दगड आणि माती आली होती .

तसंच या मार्गावर धुकं देखील बरंच होतं. ट्रेनच्या चालकाला धुकं आणि पावसामुळे रुळावर आलेले दगड दिसले नसावेत आणि म्हणून हा अपघात झाला असावा असं देखील सांगण्यात येत आहे.

कसारा ते आसनगांव दरम्यानचा मार्ग हा दुपदरी असल्याने मुंबईकडे येणाऱ्या आणि जाणाऱ्या दोन्ही मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद झालेली आहे.
ही परिस्थिती सुधारण्यासाठी संध्याकाळ’ होईल असा अंदाज वर्तवला जात आहे.

SHARE THIS

RELATED ARTICLES

LEAVE COMMENT