महावितरण म.रा.वि.वि.कं.लि. मार्फ़त जनतेवर लादलेल्या अवाजवी दर कमी करा .अन्यथा?

IMG-20190729-WA0190

प्रतिनिधि:-

दि.२८/०७/२०१९ रोजी एमआयएम पक्षा च्या वतीने मा. पालक मंत्री लातूर यांना निवेदन देण्यात आले व महावितरण म.रा.वि.वि.कं.लि. मार्फ़त जनतेवर लादलेल्या अवाजवी दर कमी करा अशी मागणी करण्यात आली.
औसा तालुका हा बऱ्याच वर्षापासून दुष्काळाने ग्रस्त आहे .
आणि महावितरण म.रा.वि.वि.कं.लि. मार्फ़त जे विज दर लादले जात आहेत ते अवाजवी व सामान्य जनतेला न परवडनारे आहेत.
भारतामध्ये व महाराष्ट्रा मध्ये बऱ्यावचशा खाजगी कंपन्या सुध्दा विज पुरवठा करतात त्यांच्या दरामध्ये व आपल्या दरामध्ये फार मोठी तफावत आहे.

जे बेस्ट ही कंपनी मुंबई सारख्या महानगरात लातूर जिल्हातिल दरापेक्षा कमी दराने विज पुरवठा करते.
तसेच दिल्ली, गोवा येथील दर देखील फार कमी आहेत.
तसेच शेतकऱ्याना एक एक वर्ष विज जोडनी मिळत नाही, वाऱ्यामध्ये लगेच विज पुरवठा बंद होतो.

जनतेवर लादन्यात आलेले दर त्वरित कमी करण्यात यावे व हा विषय विधानसभे मध्ये मांडून महावितरणच्या यूनिट दर, इतर आकार, अतिरिक्त भार तसेच १ ते २०० यूनिट पर्यंत एकच यूनिट दर ठेवण्यात यावा व त्रासदायक मीटर भाड़े रद्द करण्यात यावे .

अशा मागण्या चा निवेदन एमआयएम पक्षा च्या वतीने देण्यात आला.
या वेळेस एमआयएम औसा तालुका अध्यक्ष सय्यद मुजफ्फर अली ईनामदार तालुका कार्यअध्यक्ष न्यामत लोहार,रुक्मोद्दीन अलंदकर, सय्यद फजले रहीम,चांद मैंद,शेख सिराज आदि कार्यकर्ते उपस्थित होते.

SHARE THIS

RELATED ARTICLES

LEAVE COMMENT