लॉटरी लागून सत्तेत, ठाकरे सरकार महाराष्ट्राला सध्या जुगाराचा अड्डा करणार का ?

download

मुंबई : प्रतिनिधी.

राज्याची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी गरिबांची घरे उद्ध्वस्त करण्याचा डाव आहे.

पैशांसाठी ठाकरे सरकार सुसंस्कृत महाराष्ट्राला जुगाराचा अड्डा करणार का?
असा सवाल भाजपचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे.
आयपीएल सुरु होत असलेल्या दिवशीच याची माहिती लोकांना होणे म्हणजे सध्या सुरु असलेल्या बेकायदेशीर ऑनलाईन बेटिंगला अभय देण्याचा ठाकरे सरकारचा प्रयत्न आहे का?

असाही प्रश्न भातखळकर यांनी उपस्थित केला.
अतुल भातखळकर म्हणाले, की राज्याची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी ऑनलाईन जुगाराला अधिकृत करणे कितीपत योग्य आहे?
यासाठी वित्त विभागाचे अतिरिक्त प्रधान सचिव सुधीर श्रीवास्तव यांच्या अध्यक्षेखाली समिती नेमून अहवाल मागविला होता.

त्या अहवालानुसार राज्यात लवकरच जुगाराला अधिकृत करणार असल्याचे संकेत या सरकारने दिले आहेत.
राज्याला यातून नाममात्र रक्कम मिळेल, परंतु त्यामुळे राज्यातील लाखो कुटुंब उद्ध्वस्त होतील.
सरकारने याचा विसर पडू देऊ नये. राज्याची आर्थिक स्थिती सुधारण्याची ही पद्धत अत्यंत चुकीची आहे.

SHARE THIS

RELATED ARTICLES

LEAVE COMMENT