रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अर्थात आरबीआय द्वारे आज कोण कोणत्या महत्वपूर्ण घोषणाची केली यादि ज़ाहिर ?

प्रतिनिधी:-
करोना व्हायरसच्या जागतिक संकटामुळे जग आर्थिक मंदीच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचलं आहे.
अमेरिका आणि चीनसारख्या महासत्ता करोनाच्या विळख्यात सापडल्यामुळे जगाची आर्थव्यवस्था संकटात सापडली आहे.
या पार्श्वभूमीवर भारतीय अर्थव्यवस्था डळमळू नये आणि देशांतर्गत आर्थिक परिस्थिती नियंत्रणात राहावी,
यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अर्थात आरबीआयने आज काही महत्वपूर्ण घोषणा केल्या आहेत.
यामध्ये रेपो रेटसंदर्भात करण्यात आलेल्या घोषणेमुळे देशांतर्गत उद्योगधंद्यांना बळ मिळण्याची शक्यता आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेऊन या घोषणा केल्या आहेत.
याशिवाय सर्वात महत्त्वाची घोषणा व्याजाच्या ईएमआयसंदर्भात करण्यात आली आहे.
यानुसार, शक्तीकांत दास यांनी देशभरातल्या कर्ज देणाऱ्या बँका आणि संस्थांना येत्या तीन महिन्यांसाठी कर्जाच्या व्याजाची वसुली करू नये, अशी विनंती केली आहे. ती मान्य झाल्यास,
त्याचा देशभरातल्या उद्योगांना फायदा होईल आणि बाजारात भांडवल खेळतं राहू शकेल.
रेपो रेट ४.४० टक्क्यांवर !
गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी केलेल्या घोषणेनुसार रेपो रेट अर्थात अल्प मुदतीच्या कर्जावरचा व्याजदर कमी करण्यात आला आहे.
तब्बल ७५ बेसिस पॉइंटने हा रेपोरेट कमी करत ५.१५ टक्क्यांवरून ४.४० टक्क्यांवर तो आणण्यात आला आहे.
यामुळे व्याजाच्या रकमेत घट झाल्यामुळे हफ्त्याती रक्कम कमी होण्याची शक्यता आहे.
दुसरी महत्वाची घोषणा रिव्हर्स रेपो रेटमध्ये अर्थात बँकांना रिझर्व्ह बँकेला भराव्या लगणाऱ्या व्याजदरामध्ये देखील तब्बल ९० बेसिस पॉइंटची घट करण्यात आली आहे. त्यामुळे बँकांसाठीचा रिव्हर्स रेपो रेट ४ टक्क्यांवर आला आहे.
यामुळे बँकांना रिझर्व्ह बँकेला कमी पैसा द्यावा लागेल आणि कर्ज देण्यासाठी त्यांच्याकडे जास्त पैसा उरेल. यामुळे देखील उद्योगांना बळ मिळू शकेल.
करोनामुळे जगभरात मंदी येऊ शकते?
दरम्यान, शक्तीकांत दास यांनी करोनामुळे जागतिक मंदीची शक्यता वर्तवली आहे.
करोनाचं जागतिक संकट जगभरातला मोठा हिस्सा जागतिक मंदीच्या गर्तेत अडकू शकतो.
त्याचा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर देखील होऊ शकतो.
त्यामुळे देशाचं २०२०-२०२१ या आर्थिक वर्षासाठी ठरवण्यात आलेलं ५ टक्के जीडीपीचं उद्दिष्ट पूर्ण करणं कठीण आहे’, असं ते म्हणाले.