राज कुंद्रा चे मुंबई उच्च न्यायालय मधे अववाहन

मुंबई जिल्हा न्यायालयाने अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती आणि उद्योजक राज कुंद्रा यांना २७ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
मात्र मे.न्यायालयाने सुनावलेली पोलीस कोठडी ही कायदेशीर नसल्याचं सांगत राज कुंद्रा यांनी मे.मुंबई उच्च न्यायालयामध्ये या सुनावणीविरोधात याचिका दाखल केलीय.
आपल्याला बेकायदेशीपणे पोलिसांनी ताब्यात ठेवल्याचं राज कुंद्रा यांनी याचिकेमध्ये म्हटल्याचं ‘बेंच अ‍ॅण्ड बार’ने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.
विशेष म्हणजे आपल्याला करोना संसर्गाचं कारण देत कुंद्रा यांनी कोठडीमध्ये वाढ करण्यात येऊ नये असं आपल्या याचिकेत म्हटलंय.
मे. मुंबई जिल्हा न्यायालयाने राज कुंद्रा आणि त्यांचे सहकारी रायन तोरपे यांना २७ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
मुंबई पोलिसांनी मे. जिल्हा न्यायालयासमोर कुंद्रा आणि तोरपे यांना हजर केलं.
त्यावेळी मुंबई पोलिसांनी सात दिवसाच्या पोलीस कोठडीची मागणी केली.
ऑनलाइन बेटींगमध्ये पॉर्नोग्राफीतून मिळवलेला पैसा वापरण्यात आल्याची शक्यात व्यक्त करत मुंबई पोलिसांनी अधिक तपासासाठी सात दिवसांची कोठडी द्यावी अशी विनती केली होती.
मे.न्यायालयाने त्यानुसार या दोघांना चार दिवसांच्या पोलीस कोठडी सुनावली आहे.
मात्र आता या आदेशाला कुंद्रा यांनी मे.मुंबई उच्च न्यायालयामध्ये आव्हान दिलं आहे.

SHARE THIS

RELATED ARTICLES

LEAVE COMMENT