महाराष्ट्रात् आता जिल्ह्या ची संख्या पूर्वी पेक्षा अधिक: नवीन प्रणाली महाराष्ट्र सरकार
मुंबई
विशेष
संवाददाता
मोहमद दादासाहब पटेल
ठरलं ! महाराष्ट्रात जिल्ह्यांची संख्या वाढणार; तुम्ही कोणत्या जिल्ह्यात जाणार? नवीन जिल्ह्याची यादी, पहा.aharashtra New Districts : राज्यात 2014 पासून नवीन जिल्हा तयार झालेला नाही. यामुळे लोकसंख्येनुसार जिल्ह्याचे कामकाज पाहताना प्रशासकीय यंत्रणेला तारेवरची कसरत करावी लागत आहे.शिवाय जिल्ह्याचे भौगोलिक अंतर पाहता जिल्ह्यातील शेवटच्या टोकावरील गावातील नागरिकाला जिल्हा मुख्यालयाला कामानिमित्त जाण्यासाठी किमान एका दिवसाचा वेळ खर्च करावा लागत आहे. अशा परिस्थितीत नागरिकांची मोठी व्यवस्था होत आहे.
यामुळे भौगोलिक दृष्ट्या मोठ्या जिल्ह्यांचे विभाजन करून नवीन जिल्हे तयार करण्याची योजना राज्य शासनाची आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे नवोदित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी घोषणा देखील केली होती.
दरम्यान महाराष्ट्र दिनापासून राज्यात नवीन 22 जिल्ह्यांची निर्मिती होणार अशा चर्चा प्रसारमाध्यमांमध्ये वेगाने व्हायरल होत आहेत. दरम्यान, आज आपण महाराष्ट्रात कोणत्या नवीन 22 जिल्ह्यांची निर्मिती होणार आहे याबाबत थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.महाराष्ट्रातील प्रस्तावित 22 जिल्ह्याची यादी खालीलप्रमाणे
अहमदनगर या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या जिल्ह्याचे विभाजन करून श्रीरामपूर, शिर्डी आणि संगमनेर या तीन नवीन जिल्ह्यांची निर्मिती केली जाणार आहे.
याशिवाय नाशिक जिल्ह्याचे विभाजन करून मालेगाव आणि कळवण या दोन जिल्ह्यांची निर्मिती करणे प्रस्तावित आहे.
पालघरचे विभाजन करून जव्हार हा जिल्हा बनवणे प्रस्तावित करण्यात आले आहे.
ठाणे जिल्हा विभाजन करून मीरा भाईंदर, कल्याण हे दोन नवीन जिल्हे बनवणे प्रस्तावित आहे.
पुणे जिल्ह्याचे विभाजन करून शिवनेरी जिल्हा तयार करणे प्रस्तावित आहे. विशेष बाब म्हणजे आमदार महेश लांडगे यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या जिल्ह्याची मागणी केली आहे. इतरही आमदारांच्या माध्यमातून या जिल्ह्यासाठी उपमुख्यमंत्री महोदय यांच्याकडे पाठपुरावा सुरू आहे.
याशिवाय रायगड जिल्ह्याचे विभाजन करून महाड जिल्हा तयार करणे प्रस्तावित आहे.
सातारा जिल्ह्याचे विभाजन करून मानदेश हा नवीन जिल्हा तयार करणे.रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन करून मानगड हा नवीन जिल्हा तयार करणे प्रस्तावित आहे.
बीड जिल्हा विभाजित करून आंबेजोगाई जिल्हा तयार केला जाणार आहे.
लातूर मधून उदगीर आणि नांदेड जिल्ह्यातून किनवट हा नवीन जिल्हा तयार होणार आहे.
जळगावमधून भुसावळ अन बुलढाणामधून खामगाव हे जिल्हे तयार होणार आहेत.
अमरावती जिल्ह्याचे विभाजन करून अचलपूर जिल्हा तयार केला जाणार आहे.
यवतमाळ जिल्ह्याचे विभाजन करून पुसद हा जिल्हा तयार केला जाणार आहे.
भंडारा जिल्ह्याचे विभाजन करून साकोली हा जिल्हा तयार केला जाणार आहे.
चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून चिमूर हा जिल्हा तयार केला जाणार आहे आणि गडचिरोली जिल्ह्याचे विभाजन करून अहेरी हा नवीन जिल्हा तयार करणे प्रस्तावित आहे.