देशभक्ति चा पाठ पुरावा करणारे आता कुठे गेलेत सगळे?

9k=(14)

प्रतिनिधी.

काय विचित्र अवस्था आहे पहा  की तो कुलभूषण जाधव, तिथे एकटाच पाकिस्तानी जेलमधे फाशीच्या शिक्षेची वाट पहात बसलाय आणि आपण सगळे आयपीएल पहातोय, मजा मारतोय!

त्याला तिथे तुडवून मारत असतील आणि आपण सगळे जेवणावर ताव मारतोय!

रोज़ मनकी बात करणारे आमचे  पंतप्रधान गुजराथला पाटीदार समाजाला चुचकारण्यात व्यस्त, आहेत, आप वाले दिल्लीत भ्रष्टाचारात व्यस्त, राहुल गांधी मोदिंचे पाय ओढण्यात व्यस्त, महाराष्र्टाचे मुख्यमंत्री राणेंना पक्षात आणण्यात व्यस्त, सेनाप्रमुख मातोश्री—२ बांधण्यात व्यस्त, मनसे प्रमुख घरातील समस्येत व्यस्त. तर तुम्ही आम्ही सगळे ‘आयपीएल’ आणि स्वत:च्या आयुष्यात व्यस्त !

फक्त कुलभूषणच्या आईला, वडीलांना, बायकोला, मुलाबाळांना अन्नाचा घास घश्याखाली उतरत नसेल, आणि झोप पण येत नसेल?

आता ते कसाबकरीता मध्यरात्री न्यायालय उघडायला लावणारे वकील कुठे गेले? याकूब मेमन करीता रात्रि बेरात्री सुप्रीम कोर्ट चे द्वार उघडनारे सगळे गेले कुठे?

साधा वकील द्यायलाही नकार दिला त्याला पाकड्यांनी आजादी,मानवता म्हणून ओरडणारा तो कन्हय्या कुठे गेलाय?

एकहि पाकिस्तानी मानवता म्हणून ओरडत नाहीये, कुठे गेलाय सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागणारा केजरीवाल?

पाकिस्तानकडे एकही पुरावा नसताना कुलभूषणला फाशी सुनवलीय!

कुठे गेलाय पाकिस्तानी कलाकारांना घेऊन चित्रपट काढणारा करण जोहर आणि त्याच समर्थन करणारे ते सगळे शहाणे?

मुंबईवर हल्याची केस अजूनही  निकालाविना पडलीय आणि कुलभूषणला लगेच फासावर टांगायला निघालेत?

कुठे गेलेत ते सगळे?

या देशात आरक्षणाकरीता मोर्चा काढता ना, मग एक मोर्चा कुलभूषणकरीता पण काढा ना !

की त्याला फासावर लटकवल्यावर मेणबत्त्या लावणार आहात?

उठा, जगाला कळू द्या हिंदुस्थान काय ताकदीचा देश आहे?

कुलभूषणला वाऱ्यावर सोडलंत तर कितीतरी आई-वडिल आपल्या मुलामुलींना संरक्षण दलात पाठविणार नाहीत.

सरकारला लिहा, मोर्चा काढा, जे जे जमेल ते ते करा. पण कुलभूषणला जीवंत परत आणाच!जय हिंद जय भारत।

 

SHARE THIS

RELATED ARTICLES

LEAVE COMMENT