टूलकिट प्रकारणी कोणी केली कांग्रेस पार्टींची बदनामी?

download – 2021-05-27T215357.023

रिपोर्टर:-

टूलकिट प्रकरणी काँग्रेस पक्षाची बदनामी केल्याबद्दल व सोशल मीडियाचा गैरवापर केल्याबद्दल भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष व मंत्री जे पी नड्डा आणि स्मृती इराणी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा – भाई जगताप यांची मागणी मुंबई काँग्रेसतर्फे मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांना निवेदन देण्यात आले टूलकिट प्रकरणी काँग्रेस पक्षाची बदनामी करण्याचा डाव भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा, भाजपचे मंत्री व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आणि भाजपच्या मंत्री स्मृती इराणी यांनी आखला आणि सोशल मीडियावर काँग्रेस पक्षाची बदनामी करून, काँग्रेसची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न केला.
त्याच्या विरोधात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल करून घ्यावा व लवकरात लवकर कारवाई करावी, अशी मागणी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप व कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा यांनी मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे केली.

भाई जगताप यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई काँग्रेसच्या एका शिष्टमंडळाने मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांची भेट घेतली व त्यांना निवेदन दिले.
या शिष्टमंडळामध्ये भाई जगताप व चरणसिंग सप्रा यांच्या सोबत मुंबई काँग्रेसचे खजिनदार भूषण पाटील, सहखजिनदार अतुल बर्वे सहभागी होते.

या संदर्भात अधिक माहिती देताना भाई जगताप म्हणाले की, भाजपच्या नेत्यांनी मुंबई काँग्रेसचे सोशल मीडियाचे काम करणाऱ्या आमच्या टीमचे लेटरहेड हस्तगत करून, त्यावर बनावट मजकूर टाकला व ते गैर पद्धतीने ट्विटर वर टाकले.
ट्विटर ने सुद्धा हे मान्य केलेले आहे की, या पोस्ट मध्ये टाकलेली कागदपत्रे व मजकूर बनावट आहे.

ज्या प्रकारे संबित पात्राने टूलकिटच्या प्रकरणाच्या माध्यमातून खोटा व बनावट मजकूर टाकून काँग्रेस पक्षाला बदनाम करण्याचा, काँग्रेसची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न केला,
त्याच्या विरोधात गुन्हा दाखल व्हावा व त्यांच्या विरोधात समन्स दाखल केले जावे अशी आम्ही आज मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्याजवळ निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
या प्रकरणी सायबर सेल शी चर्चा करून, त्याची पूर्ण शहानिशा करून त्यानुसार आम्ही कारवाईला सुरुवात करू असे आश्वासन मुंबई पोलीस आयुक्तांनी आम्हाला दिले आहे,
अशी माहिती भाई जगताप यांनी दिली.

SHARE THIS

RELATED ARTICLES

LEAVE COMMENT

रिपोर्टर:- मुख्यमंत्री के हवा हवाई वादों और दौरों से उत्तर प्रदेश की हवा निकल गई, अलीगढ़ की जहरीली शराब से हुई मौतों की जिम्मेदार हैं...

READ MORE

केंद्र की मोदी सरकार का पुरानी तर्ज पर लिया बड़ा फैसलागैर मुस्लिम शरणार्थियों को देगी नागरिकता पर मुस्लिमो को नही?

May 30, 2021 . by admin

रिपोर्टर:- भारत की नरेंद्र मोदी सरकार ने गैर-मुस्लिम शरणार्थियों की नागरिकता को लेकर बड़ा फैसला किया है। देश के 13 जिलों में रहे पाकिस्तान, बांग्लादेश...

READ MORE

नागरिकता क़ानून का आदेश, 28 मई 2021को केंद्रीय गृह मंत्रालय का क्या है नये आदेश की पहल?

May 29, 2021 . by admin

रिपोर्टर :-  केंद्रीय गृह मंत्रालय (MHA) ने अफगानिस्तान, पाकिस्तान, बांग्लादेश से आए गैर-मुस्लिम शरणार्थियों से भारतीय नागरिकता के लिए आवेदन मांगे हैं। केंद्र सरकार ने...

READ MORE

TWEETS