कोण आहे रवि पुजारी ? अंधेरीच्या रस्त्यावरुन भाईगिरी सुरु करणारा अचानक कसा बनला अंडवर्ल्ड डॉन ?

IMG-20200223-WA0062

प्रतिनिधी:-

९० च्या दशकातील कुख्यात गँगस्टर रवी पुजारीला आफ्रिका खंडातील सेनेगल या देशामध्ये अटक झाली असून, त्याला भारतात आणण्याची प्रकिया सुरु आहे.
त्यासाठी कर्नाटक पोलिसांची विशेष टीम आणि ‘रॉ’ चे पथक सेनेगल मध्ये तळ ठोकून आहे.

कोण आहे रवी पुजारी ?

रवी पुजारी आता ५१ वर्षांचा असून, तो मूळचा कर्नाटकातील उडिपी जिल्ह्यातील मालपी या गावचा.
त्याचे वडिल सुर्या पुजारी एका शिपिंग कंपनीमध्ये नोकरीला होते.

त्याची आई आणि बहिण दिल्लीमध्ये राहतात. रवी पुजारीचा जन्म कर्नाटकमध्ये झाला असला तरी, तो लहानाचा मोठा मुंबईमध्ये झाला.
अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीच्या गुन्हेगारीची सुरुवात मुंबईच्या रस्त्यावरुन झाली. शाळा अर्धवट सोडणारा रवी पुजारी सुरुवातीला अंधेरीमध्ये छोटे-मोठे गुन्हे करायचा.
पण बाळा झाल्टेची हत्या केल्यानंतर रवी पुजारी हे नाव मुंबईच्या गुन्हेगारी विश्वात चर्चेत आले.
छोटा राजनची नजर रवी पुजारीवर गेली व छोटा राजन गँगसाठी काम करु लागला. अल्पावधीत त्याने राजनचा विश्वास संपादन केला.
९० च्या दशकात रवी पुजारी दुबईला गेला व मुंबईतील रिअल इस्टेट क्षेत्रातीव बिल्डर्सकडून खंडणी वसुली सुरु केली. ९० च्याच दशकात त्याच्या तीन माणसांनी चेंबूरच्या ऑफीसमध्ये घुसून ओम प्रकाश कुकरेजा यांच्यावर गोळया झाडल्या. आठ वर्षांपूर्वी नवी मुंबईतील एका बिल्डरवर त्याने हल्ल्याचा प्रयत्न केला पण सुदैवाने ते बचावले.

भारत सोडून पळाल्यानंतर रवी पुजारीने काही काळ ऑस्ट्रेलियन पासपोर्टवर ऑस्ट्रेलियामध्ये वास्तव्य केले.
या दरम्यान त्याने हिंदू डॉन म्हणूनही स्वत:ला स्थापित करण्याचा प्रयत्न केला.
१३ फेब्रुवारी २०१६ रोजी जेएनयूमधील वादावरुन रवी पुजारीने हुरियतचे नेते सय्यद अली शाह गीलानी यांना संपवण्याची धमकी दिली.

रवी पुजारीने नंतर बॉलिवूडमधल्या अनेक सेलिब्रिटींनाही धमकावण्याचा प्रयत्न केला. २०१७-१८ मध्ये अनेकांनी त्याच्याकडून धमकीचे फोन येत असल्याबद्दल तक्रारी दाखल केल्या.
२०१९ मध्ये केरळचे आमदार पी.सी.जॉर्ज यांनी रवी पुजारीकडून धमक्या येत असल्याची पोलीस तक्रार केली.
जॉर्ज यांना हे फोन कॉल सेनेगलमधून येत असल्याचे केरळ पोलिसांच्या तपासातून समोर आले.
२००९ ते २०१३ दरम्यान रवी पुजारीने सलमान खान, अक्षय कुमार, करण जोहर, राकेश रोशन अशा अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींना धमक्या दिल्या.
जानेवारी २०१९ मध्ये सेनेगलच्या दाकारमध्ये त्याला अटक झाली.

SHARE THIS

RELATED ARTICLES

LEAVE COMMENT

रिपोर्टर:- ख़ुद को सबसे शक्तिशाली समझने वाले अमेरिकी राष्ट्रपति ट्रम्प ने कोरोना वायरस के आगे टेके घुटने। क्या अमेरिका में दो लाख से अधिक लोगों...

READ MORE

क़ाय कोरोना च्या भीति ने चाकर्मणी मुम्बई सोडून आप आपल्या गावी जायला उत्सुक आहेत ?

March 29, 2020 . by admin

रत्नागिरी-सिंधुदुर्ग विभागाचे माननीय खासदार विनायक राऊत , यांनी महाराष्ट्राचे मुख्य मंत्री माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्यांना विनंती पत्र पाठवून, रत्नागिरी-सिंधुदुर्ग विभागातील सध्या मुंबई मधे असलेल्या...

READ MORE

CAA,NRCऔर NPR को लेकर प्रधानमंत्री और ग्रहमंत्री से उलमाओ ने की मुलाकात, सौपा ज्ञापन, तो क्या अब किसी को भी घबराने की जरूरत नही ?

March 29, 2020 . by admin

 बरेली:- गत दिनों प्रधानमंत्री श्री नरेन्द्र मोदी जी और ग्रहमंत्री श्री अमित शाह जी से आल इंडिया तन्जी़म उलमा-ए-इस्लाम के उलमा का एक प्रतिनिधि मण्डल...

READ MORE

TWEETS