हसन मुशरिफ वर का पडली ईडी ची धाड़ नेमक प्रकरण काय

कोल्हापूर: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ आणि प्रमुख नेत्यांपैकी एक असलेल्या यांच्या घरावर सकाळी ई.डी.चा छापा पडला.
सध्या ई.डी. आणि प्राप्तीकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून हसन मुश्रीफ यांचे घर, कार्यालय आणि नातेवाईकांच्या घरी झाडाझडती घेतली जात आहे. हसन मुश्रीफ यांच्यावर ही कारवाई होण्यापाठी भा.ज.पाक नेते किरीट सोमय्या यांनी गेल्या वर्षभरापासून ई.डी.कडे केलेला पाठपुरावा महत्त्वाचा मानला जात आहे.

महाविकास आघाडीचे सरकार असतानाच किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांनी बनावट कंपन्यांच्या माध्यमातून १५८ कोटींचा गैरव्यवहार केल्याचा आरोप केला होता.
राज्यात सत्तापालट झाल्यानंतरही किरीट सोमय्या आणि कागलमधील एका भा.ज.पा. नेत्याकडून दिल्लीत याप्रकरणाचा पद्धतशीरपणे पाठपुरावा सुरु होता.

किरीट सोमय्या यांनी
३१ डिसेंबरला एक ट्विट करत अनिल परब, हसन मुश्रीफ आणि अस्लम खान यांच्या घोटाळ्यांचा हिशेब पूर्ण करणार असल्याचे वक्तव्य केले होते.
त्यानुसार सुरुवातीला अनिल परब आणि आता हसन मुश्रीफ यांच्यावर ई.डी.ची कारवाई झाली आहे.

हसन मुश्रीफांवर कोणत्या प्रकरणात कारवाई?

महाविकास आघाडी सरकारच्या काळात किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर घोटाळ्याचे आरोप करायला सुरुवात केली होती.
मुश्रीफ आणि त्यांच्या कुटंबीयांनी बनावट कंपन्या तयार करुन १५८ कोटींचा भ्रष्टाचार केल्याचे सोमय्यांचे म्हणणे आहे.

विविध कंपन्यांच्या माध्यमातून मुश्रीफ कुटुंबीयांच्या बँक खात्यात कोट्यवधी रुपयांची रक्कम वळती करण्यात आली.
यामध्ये मुख्यत्त्वेकरुन मुश्रीफ यांचा मुलगा आणि जावयाचा समावेश असल्याचा आरोप आहे. किरीट सोमय्या यांच्या दाव्यानुसार, २०२० मध्ये पारदर्शक व्यवहार न होता अप्पासाहेब नलावडे साखर कारखाना ब्रिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडला चालवण्यासाठी दिला गेला.

या कंपनीस साखर कारखाना चालवण्याचा कोणताही अनुभव नसताना या कंपनीला कंत्राट का दिले?
मुश्रीफांचे जावई या कंपनीचे मालक आहेत,
असा आरोप सोमय्या यांनी केला होता.
केंद्राकडून मिळणारा निधी थेट ग्रामपंचायतीच्या खात्यात जमा होतो.
या निधीमध्ये मुश्रीफ यांनी जावयासोबत पंधराशे कोटींचा घोटाळा केला आहे.
कंपनी अस्तित्वात नसताना या कंपनीला ठेका देण्यात आला. जावई मतीन मंगोली यांच्या बेनामी कंपनीला दादागिरीने ठेका दिला.

बेनामी, बंद असलेल्या आणि अस्तित्वात नसलेल्या कंपन्यांच्या माध्यमातून त्यांनी घोटाळे केले आहेत.
यश, अष्टविनायक, ब्रिक्स इंडिया आणि इतर काही कंपन्यांचा यासाठी वापर केला आहे.

हसन मुश्रीफांचा पार्टनरही अडचणीत

ई.डी.कडून पुणे परिसरातील छापे टाकण्यात आले आहेत. हसन मुश्रीफ यांचे भागीदार चंद्रकात गायकवाड यांच्या घरी आणि ऑफिसमध्येही ई.डी. ची छापेमारी झाली आहे.
पुण्यातील शिवाजीनगर भागातील ब्रिस्क इंडिया प्रायव्हेट कंपनीच्या कार्यालयाची झाडाझडती घेतली जात आहे. अनेक अधिकारी या कार्यालयात चौकशी करत आहेत.
चंद्रकांत गायकवाड हे हसन मश्रिफांचे व्यवसायिक भागीदार आहेत.

ते ब्रिक्स इंडीया कंपनीचे संचालक आहेत.
सरसेनापती संताजी घोरपडे कारखाना ब्रिक्स इंडियाने उभारला आणि आप्पासाहेब नलावडे कारखाना देखील हीच कंपनी चालवत होती.
चंद्रकात गायकवाड व्यवसायाने कंपनीचे सेक्रेटरी आहेत. कलकत्ता स्थित कंपन्यांमधून पैसे मुश्रीफांच्या कारखान्यात आणण्यात गायकवाड यांचा हात असल्याचा आरोप आहे.

भ्रष्टाचार करताना हसनमियाँना धर्म आठवला नाही का?

किरीट सोमय्या
ई़.डी.च्या कारवाईनंतर हसन मुश्रीफ यांनी काही सवाल उपस्थित केले होते.
सर्वप्रथम नवाब मलिक यांना अटक झाली,
आता माझ्यावर कारवाई होत आहे.
यानंतर किरीट सोमय्यांनी अस्लम शेख यांना इशारा दिला आहे. त्यामुळे या सगळ्या कारवाईमागे विशिष्ट जातीधर्माच्या लोकांना लक्ष्य करण्याचे षडयंत्र असल्याची शंका येते,
असे मुश्रीफ यांनी म्हटले होते. मुश्रीफ यांच्या या आरोपांना किरीट सोमय्या यांना तात्काळ पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिले.

हसन मुश्रीफ यांचं काऊंटडाऊन सुरु झाले आहे.
त्यांनी गेल्यावर्षी गणेश विसर्जनाच्या दिवशी मला कोल्हापुरात येण्यापासून रोखले. त्यांनी मला महालक्ष्मीचे दर्शन घेऊन दिले नाही.
पण आज महालक्ष्मी देवीने मला आशीर्वाद दिला.
हसनमियाँना आता धर्म आठवतो. पण भ्रष्टाचार करताना आणि शेतकऱ्यांना लुटताना त्यांना धर्म आठवला नाही का?
दोन बंद झालेल्या कंपन्यांमधून त्यांच्या कुटुंबाला ५० कोटी रुपये मिळाले.


हे कुठल्या भ्रष्टाचाराचे पैसे होते? मी प्रथम अनिल परब, नंतर हसन मुश्रीफ आणि त्यानंतर अस्लम शेख यांच्यावर कारवाईचा इशारा दिला होता.
त्यामुळे विशिष्ट जातीधर्माच्या लोकांना लक्ष्य करण्यात येत असल्याच्या आरोपात तथ्य नसल्याचे किरीट सोमय्या यांनी स्पष्ट केले.

SHARE THIS

RELATED ARTICLES

LEAVE COMMENT