मंत्रालय कडून 100कोटी रुपए निधि मंजूर , दोघे बहिन.. भावात जुंपली
१०० कोटी रुपयांचा निधी आपल्यामुळेच मंजूर झाल्याचा दोघांचा दावा
बीड : राज्याच्या राजकारणात मुंडे बहीण-भाऊ यांच्यातील शाब्दिक चकमक नेहमीच होताना पाहायला मिळते.
दरम्यान, पुन्हा एकदा भा.ज.पा. नेत्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांच्यात श्रेयवादावरून जुंपली असल्याचे पाहायला मिळत आहे.
परळीतील दोन उड्डाणपुलांच्या कामासाठी केंद्रीय मंत्रालयाने १०० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
त्याच्या श्रेयवादावरुन आता मुंडे बहिण आणि भावात जुंपल्याचे दिसत आहे.
परळी शहरातील डॉ. शामाप्रसाद मुखर्जी रेल्वे उड्डाणपूलाचे विस्तारीकरण आणि चौपदरीकरण तसेच अंबाजोगाई-लातूर मार्गावरील बीड जिल्हयाच्या हद्दीतील रस्त्याचे चौपदरीकरणासाठी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी १०० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यावरुन या दोघांनीही आपल्यामुळेच हा निधी मिळाल्याचा दावा केला असून गडकरींचे आभार मानले आहेत.
परळी शहरातील डॉ. शामाप्रसाद मुखर्जी रेल्वे उड्डाणपूलाचे विस्तारीकरण आणि चौपदरीकरण तसेच अंबाजोगाई-लातूर मार्गावरील बीड जिल्हयाच्या हद्दीतील रस्त्याचे चौपदरीकरण यासाठी शंभर कोटी रूपयाचा निधी भा.ज.पा.च्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे व खा. डॉ.प्रितम मुंडे यांच्या मागणीनंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मंजूर केला आहे.
याबद्दल पंकजा मुंडे यांनी ट्वीट करत गडकरी यांचे आभार मानले आहेत.
श्यामाप्रसाद मुखर्जी रेल्वे उड्डाणपूल चौपदरीकरण व राज्य मार्ग ३६१ एफ वरील परळी शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौक ते औष्णिक विद्युत प्रकल्पाचे प्रवेशद्वार या रस्त्याचे व त्यावरील रेल्वे उड्डाण पुलासह चौपदरीकरण करणे ही दोन कामे समाविष्ट करण्यात आली असून यासाठी १०० कोटी रुपये याच आर्थिक वर्षात मंजूर करण्यात आले आहेत.
या दोन्ही कामांची लवकरच निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार असून,
धनंजय मुंडे यांनी समस्त परळीवासीयांच्या वतीने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आभार मानले आहेत.