नागपूरच्या आमदार निवासात अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार सर्वत्र जागी खलबल !

images(70)

प्रतिनिधी.

नागपूरच्या आमदार निवासमध्ये एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडलीय.

गेल्या 3 दिवसांपासून या अल्पवयीन मुलीवर अत्याचार सुरू होते. या घटनेत दोन आरोपींना अटक करण्यात आलीये.

अमरावती रोडवरील सिव्हिल लेन भागात असलेल्या आमदार निवासात अल्पवयीन मुलीवर गेल्या तीन दिवसांपासून सामूहिक बलात्काराची धक्कादायक घटना घडली.

या प्रकरणी दोन नराधमांना अटक करण्यात आलीये.

मनोज भगत आणि रजत मद्रे अशी आरोपींची नावे आहेत आणि त्यांना नागपूरच्या गिट्टीखदान पोलिसांनी अटक केली आहे.

पीडित मुलगी ही ४४ वर्षीय मनोज भगत याच्या ज्वेलर्सच्या दुकानात काम करत होती.

मनोजने या मुलीला फसवून आमदार निवास परिसरात आणले. दरम्यान या ठिकाणी २० वर्षीय रजत मद्रे याने ही आमदार निवासाची खोली बुक केली.

याच ठिकाणी मनोज भगत आणि रजत मद्रे या दोघांनी या मुलीवर सलग तीन दिवस अत्याचार केले.

१४ एप्रिलला ही मुलगी नागपूरच्या गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतून बेपत्ता झाली होती.

दरम्यान या मुलीच्या आई वडिलांनी पोलिस ठाण्यात मुलीच्या हरवण्याचा गुन्हा दाखल केला होता.

पोलिसांनी या प्रकरणात तपास करून या प्रकरणातील दोन आरोपींना ताब्यात घेतले. आमदार निवासातील खोल्या या आमदार किंवा वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांच्या चिठ्ठीनेच दिल्या जातात पण या प्रकरणात आरोपी मनोज भगत याला ही खोली खाजगी व्यक्ती म्हणून देण्यात आली होती.

नागपूरच्या सिव्हिल लाईन्स भागात असणाऱ्या या आमदार निवासातील या घटनेमुळे या ठिकाणी सुरक्षेसाठी असणारे पोलीस आणि काम करणारे कर्मचारी यांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.

राज्याचे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहे !

SHARE THIS

RELATED ARTICLES

LEAVE COMMENT