दिल्लीत भीख मागन्यासाठी, चोरले मूल, महिलेला अटक,बोरीवली रेलवे पोलिसांची चोख कार्रवाई
बोरिवली रेल्वे स्थानक
परिसरातून तीन वर्षांच्या लहान मुलाचे अपहरण केल्याप्रकरणी एका महिलेला बोरिवली रेल्वे पोलिसांनी अटक केली.
तर चोरीमध्ये मदत केल्याने महिलेच्या दोन अल्पवयीन मुलींना ताब्यात घेऊन त्यांची रवानगी बालगृहात केली आहे.
पोलिसांना पोहचण्यास उशीर झाला असता तर ती महिला त्या मुलाला घेऊन दिल्लीला जाणार होती.
बोरिवली रेल्वे स्थानकात परिसरात एक महिला राहते.
गेल्या आठवडय़ात अपहरण झालेले मूल बोरिवली स्थानक परिसरात खेळत होते.
तेव्हा अटक महिला ही तिच्या दोन अल्पवयीन मुलींसोबत बोरिवली स्थानकात आली.
महिलेच्या दहा वर्षांच्या मुलीने त्या मुलाला उचलले.
त्यानंतर तिने त्या मुलाला पंधरा वर्षांच्या मुलीच्या स्वाधीन केले.
तिने ते मूल अटक महिलेकडे दिले.
मूल चोरल्यानंतर त्या तिघी दादर स्थानकात आल्या.
दुपारी मुलाची आई बोरिवली स्थानकात आली.
तेव्हा तिला तिचे मूल जागेवर दिसले नाही.
तिने बोरिवली रेल्वे पोलीस ठाण्यात धाव घेतली.
महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला.
वरिष्ठ निरीक्षक अनिल कदम यांच्या पथकातील अधिकाऱ्याने तपास सुरू केला.
तपासा दरम्यान पोलिसांनी तेथील सी.सी.टी.व्ही. फुटेजची तपासणी केली.
एका फुटेजमध्ये महिला त्या मुलाला घेऊन जात असल्याचे दिसले.
ती महिला दादर रेल्वे स्थानकात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
त्या माहितीनंतर पोलिसांचे पथक दादर येथे गेले.
तेथून पोलिसांनी महिलेला आणि तिच्या दोन मुलींना ताब्यात घेऊन अपहरण झालेल्या मुलाची सुटका केली.
पहिल्यांदाच आली होती मुंबईत
दिल्लीत जेवढे लहान मूल तेवढी त्याला जास्त भिक्षा मिळते.
त्यामुळे अटक महिला ही तिच्या दोन मुलींसोबत दिल्लीहून मुंबईत आली.
जास्त भिक्षा मिळेल या हेतूने तिने मुलाचे अपहरण केले.
ती महिला ही पहिल्यांदाच मुंबईत आली होती.
तिने यापूर्वी कुठे मूल चोरले आहे का ?
याचा तपास बोरिवली रेल्वे पोलीस करत आहेत.