आता वसई-विरारच्या पत्रकारांनचे आले अच्छे दिन!

IMG-20180527-WA0095

प्रतिनिधी.
मुख्यमंत्र्याचा दिलासा ; खोट्या कारवाईची भिती न बाळगण्याचे केले आवाहन !

महाराष्ट्रा तिल वसई-विरारच्या पत्रकारांनी निर्भिडतेने आपले पत्रकारितेचे कर्तव्य बजवावे,
खोट्या वा बनावट तक्रारीवरुन पोलीसांत गुन्हा दाखल होण्याची भिती अजिबात बाळगू नये, असे यापूर्वी झाले असल्यास त्याप्रकरणात फेरचौकशी करण्याचे आदेश पोलिस अधीक्षकांना दिले जातील.

यापूढे एखाद्या प्रकरणात पत्रकारांवर कारवाई करतांना अधिक काळजी घेतली जाईल, योग्य पुरावा आणि आवश्यक खातरजमा केल्याशिवाय एकतर्फी गुन्हे दाखल केले जाणार नाहीत, असे सुस्पष्ट आश्र्वासन मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांनी ‘वसई विरार महानगर पत्रकार संघा’चे अध्यक्ष अनिलराज रोकडे यांच्या नेतृत्वाखाली भेटलेल्या पत्रकारांच्या शिष्टमंडळास आज दिले.

वसई प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रभाकर कुडाळकर,ज्येष्ठ पत्रकार रविंद्र माने, सुनील घरत, विश्वनाथ कुडू,विजय गायकवाड, चंद्रकांत भोईर, दत्तात्रय कराळे, बसंत (बल्लू)अग्रहारी, हरिश्चंद्र गायकवाड, छायाचित्रकार हनिफ पटेल,मच्छिंद्र चव्हाण यांच्यासह पत्रकार संघटनांचे अनेक पदाधिकारी-सदस्य यावेळी उपस्थित होते.

वसई तालुक्यातील ज्येष्ठ व मान्यवर तीस पत्रकारांच्या स्वाक्षरींचे एक सविस्तर निवेदन यावेळी ज्येष्ठ पत्रकार रोकडे यांच्याहस्ते देण्यात आले.
पत्रकारांचे प्रश्र्न समजून घेत, गृहमंत्री या नाते मुख्यमंत्र्यांनी निवेदन वाचून खूपच सकारात्मक प्रतिसाद आज दिला.

या निवेदनाचा चांगला परिणाम लवकरच तूम्हाला अनुभवास येईल, असेही यावेळी मुख्यमंत्री महोदयांनी आवर्जून सांगितले.
भेटीसाठी पूरेेेसा वेळ दिल्याबद्दल चंद्रकांत भोईर यांनी पत्रकारांच्यावतीने मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.

SHARE THIS

RELATED ARTICLES

LEAVE COMMENT