अभिनेता मनोज कुमार बद्दल काहि खास की या सुपरहिट चित्रपट ने मनोज कुमार ला स्टार बनवले
‘हरियाली और रास्ता’ ची सुपरहिट गाणी
काही चित्रपट गाण्यांमुळे गाजतात.
काही चित्रपटातील गाणीच गाजतात.
काही चित्रपट आणि त्यातली सर्व गाणी दोन्ही गाजतात….आणि असा चित्रपट जर एखाद्या धडपडणाऱ्या कलाकाराला स्टार बनवून गेला तर तो चित्रपट लक्षात राहतो…असंच काहीतरी घडलं मनोज कुमार बद्दल.
फॅशन’ चित्रपटाद्वारे पदार्पण करून त्याला दोन-तीन वर्षे हवे तसे यश मिळवता आले नव्हते आणि अशातच आला विजय भट ह्यांचा ‘ हरियली और रास्ता’ , ह्या सुपरहिट चित्रपटाने मनोज कुमारला स्टार बनवले.
चित्रपटाची नायिका होती माला सिन्हा. चित्रपटाची कथा काय होती माहीत नाही पण जवळपास साठ वर्ष झाली तरी ह्या चित्रपटातील शंकर-जयकिशन ह्या जादूगारद्वयीची
गाणी अविस्मरणीय आहेत!
इब्तीदाये इश्क मै हम सारी रात जागे, अल्लाह जाने क्या होगा आगे, ओ मौला जाने क्या होगा आगे’ हे लता -मुकेश च्या आवाजातील युगलगीत आजही जुन्या गाण्यांच्या रसिकांमध्ये लोकप्रिय आहे! एस-जेंची चाल गाण्याला एका उंचीवर नेते आणि मग खळाळणाऱ्या अवखळ झऱ्यासारखी सोडून देते, त्यामुळे हे गाणे अजून श्रवणीय होते.होत राहते!
ह्या चित्रपटातील टायटल सॉंग म्हणजे ‘ ये हरियाली और ये रासता, इन राहों पर तेरा मेरा जीवनभर का वासता, लताबाईंच्या काही अविस्मरणीय गाण्यातील एक! हसरत जयपुरीने हे गाणे लिहिताना हरियाली आणि रस्त्याच्या एकत्र असण्याचं आणि जीवनभर साथ देणाऱ्या जोडीदाराचे नाते असे बेमालूम सादर केले आहे की ही उपमा अगदी सार्थ ठरते.
लाखो तारे आसमान मे, एक मगर ढुंढे न मिला,
देख के जग की ये दिवाली, दिल मेरा चुपचाप जला’
ह्या गाण्याची आर्तता जाणून घेण्यासाठी हे गाणे ऐकायलाच हवे.
हसरत- एसजेंच्या ह्या गाण्याला मुकेशने आपल्या सॅड स्पेशल अंदाजाने तेवढ्या उंचीवर नेऊन त्यातील आर्तता व्यक्त केली आहे तर लताबाईंनी ह्या गाण्यातील व्याकुळता छान व्यक्त केली आहे.
तेरी याद दिल से भुलाने चला हूं’ हे म्हणजे सॅड सॉंग्ज मधील एक आद्य गजल आहे. मुकेशचा ह्या प्रकारच्या गाण्यांना सूट होणारा आवाज आणि ‘ खुद अपनी हस्ती,मिटाने चला हूं’ सारखी अतीव सॅड फिलिंग शैलेंद्रने सुरेख लिहिली आहेत, पुढची ओळ ‘ कभी इस जगह ख्वाब देखे थे मैने , वही ख़ाक अपनी उड़ाने चला हूँ’ ही ओळ अतिशय सुरेख लिहिली आहे.
नाव हांकणाऱ्या नावाड्याच्या तोंडी एखादे सुरेख गाणे देऊन त्या सिच्युएशन मध्ये नायक-नायिकेला इंव्हॉल्व्ह करून त्यांच्या मनीचे भाव आणि गाणे कोरिलेट करणे हे तत्कालीन चित्रपटात हमखास असायचे तसेच एक गाणे म्हणजे ‘ खो गया है मेरा प्यार’ ! एसजे आणि महेंद्र कपूर हे तसे फारसे एकत्र न आलेले कॉम्बिनेशन पण ह्या गाण्याला महेंद्र कपूर ह्यांनी आपल्या मोकळ्या सोडलेल्या आवाजाने एक वेगळीच रंगत आणली आहे, थोडं सॅड सिच्युएशन मधील हे गाणे महेंद्र कपूर ह्यांच्या आवाजामूळे सुश्राव्य झाले आहे.
हसरत जयपुरीने जोडलेल्या हरियाली और रास्ताचे पुढे शैलेंद्रने अजून सुरेख गाणे लिहिले ” बोल मेरी तकदीर मै क्या है मेरे हमसफर अब तो बता, जीवन के दो पहलू है हरियाली और रासता” असे.
प्रेमात समर्पणाची अतिशय सुरेख वाक्ये ह्या गाण्यात शैलेंन्द्रने लिहिली
खुश हूँ तू जिस हाल में रखे, तेरी थी तेरी हूँ सदा
जीवन के दो पहलू हैं, हरियाली और रास्ता.
‘
मनोज कुमार, माला सिन्हा ह्यांचा हा चित्रपट सुपरहिट झाला पण गाणी अजूनही ऐकायला मस्त वाटतात.
दिग्दर्शक विजय भट ह्यांनी हीच जोडी रिपीट करून दोन वर्षांनी ‘हिमालय की गोद मे’ बनवला आणि तो पण हिट झाला.त्यातील चांद सी मेहबुबा हो मेरी ऐसा मैने सीचा था’ आणि ‘ कंकरिया मार के जगाया’ ही गाणी खुप गाजली, त्याबद्दल पुन्हा कधी.
प्रस्तुत पोस्ट मध्ये ज्येष्ठ कलाकारांना एकेरीत संबोधले आहे त्या बद्दल माफी असावी परंतु लेखनात आणि वाचनात सहजता यावी म्हणून तसे करावे लागले आहे.
सभार:
हाजी हैदर कासम शेख