पत्रकार वारिसे यांच्या मृत्युमागे नाणार रीफायनारिच्या दलालांचा कट! पहा काय आहे खास प्रकरण?
पत्रकार वारीसेंच्या मृत्यूमागे नाणार रिफायनरीच्या दलालांचा हात;
खासदार विनायक राऊत याचा घाणाघाती आरोप*
रत्नागिरी:-राजापूर येथील एका वर्तमानपत्राचे शशिकांत वारीसे पत्रकार होते. ते रिफायनरीला विरोध करणाऱ्या गटास समर्थन करीत होते. तर अपघातातील चालक पंढरीनाथ आंबेरकर हे नाणार रिफायनरीचे समर्थन करीत होते. आंबेरकर यांनी यापूर्वी रिफायनरीला विरोध करणाऱ्यांच्या अंगावर वाहन चालवून अनेकांना ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप खासदार विनायक राऊत यांनी केला आहे. तसेच आंबेरकरांवर 302अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणीही राऊत यांनी केली.
त्याच्याविरोधात गावकऱ्यांनी अनेक तक्रारी दाखल केल्या आहेत. त्यानुसार राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहे.यानंतर राऊत म्हणाले, आंबेरकरांच्या या कारवायांच्या पार्श्वभूमीवर वारीसेंच्या झालेल्या मृत्यूची पोलिसांनी गंभीर दखल घ्यावी.अश्या प्राकारे पत्रकाराचा अपघात नसून रिफायनरीच्या दलालाने घडवून आणलेला घातपात आहे. नागरिकांनी केलेल्या चौकशीच्या मागणीला माझा खंबीर पाठिंबा आहे. तसेच रत्नगिरी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडेही या प्रकरणाची चौकशीची मागणी करणार आहे.
सविस्तर बातम्मी नुसार
गेल्या एक वर्षात आंबेरकरांनी घातपात घडवून आणण्याच्या दोन ते तीन घटना आहेत. तसेच न्यायालयात नागरिकांच्या अंगावर दगडफेक केली होती. त्याबाबत पोलीस ठाण्यात नोंद आहे. त्याच घटनांच्या पार्श्वभूमीवर कालची घटना घडली आहे. याचा लेखाजोखाच पोलिसांसह न्यायालयात मांडणार आहे. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र देणार आहे. तसेच संसदेतही हा मुद्दा मांडणार आहे, असे खासदार राऊत यांनी सांगितले.
संवाद साभार
आबा खवनेकर