त्वचा रोगांच्या आहारिय कारण चा विचार केला तर बर अन्यथा लोंचे हानिकारक आहे.

त्वचारोगांच्या आहारीय कारणांचा विचार केला तर ‘लोणचे ‘ हे कारण बहुतेकदा सापडतेच !

सुपरमार्केट मधे तुम्ही गेला तर लोणचे एकावर एक फ्री मिळते . ५० % सवलत हे खिशाला सुखावणारे प्रकरण आहे .
१ किलोच्या बरणीत वर असलेला तेलाचा तवंग पाहून मला तरी धडकी भरते . इतके तेल . . बापरे !
तेलाला ऑयली आणि तुपाला फॅटी म्हणणारे मेयॉनीज आणि लोणचे मात्र चाटून पुसून खातात हा विरोधाभास आहे . असो !

मी लोणचे खात नाही . लोणच्याच्या बरण्या मात्र पहायची आवड आहे .
त्याचे जिन्नस नीट पाहिले तर – कॉटन सीड ऑइल , मोहरी चे तेल इत्यादी पाहायला मिळते .
शरीरात त्याने काय भडका उडतो याची आपल्याला जाणीव नसते !

लोणच्याचे अगदीच प्राथमिक विभाजन करायचे झाले तर गोडाकडे जाणारे लोणचे – गोड लिंबू , चुंदा , साखर आंबा , गोडंबा इत्यादी .
तिखटकडे जाणारे – आंबा ते माईनमुळ सर्व . मला ग्राहक म्हणून पडलेला बेसिक प्रश्न – ५० % ऑफ केवळ तिखट लोणच्यांनाच का असते ?
ते करायला आणि विकायला स्वस्त असतात म्हणून असेल कदाचित !

सिम्पल पिंपल (मुखदूषिक ) ते किचकट सोरियासिस असा त्वचा रोगांचा एक मोठा कॅनव्हास आपण आरोग्य मंदीर मधे ट्रीट करतो .
बहुतेक लोकांना जेवताना लोणच्याची एखादी फोड खायची सवय असतेच . .
चव येते , खायला बरे वाटते , आंब्याची फोड चघळत बसायला छान वाटते इथपासून ते सकाळी भाजी बनवायला वेळ नसतो म्हणून लोणचे पोळी इथपर्यंत अनेक कारणे असतात .
या कारणांमुळे किंवा सवयी असताना रक्त आणि पित्त दूषित होत आहेत याची कोणाला जाणीव नसते .

खारे शेंगदाणे नियमित खाणाऱ्या लोकांचे केस तुलनेने लवकर पिकतात , वाळूवर भाजलेल्या लाह्या -पोपकोर्न -फ्रायम्स खाणाऱ्या लोकात मुतखडा होण्याचे प्रमाण अधिक असते , भरपूर आणि कडक चहा पिणाऱ्या स्त्रियांचे पाळीचे घड्याळ बिघडलेले असते अशी काही क्लिनिकल ऑब्सर्व्हशन असतात तसेच नियमित लोणचे खाणाऱ्या लोकात त्वचा रोगाचे प्रमाण अधिक आहे हेही खरे आहे .

मुळात लवण (मीठ ) हा रोज खायचा पदार्थच नाही .आपातभद्रं प्रयोगसमसाहुण्यात ” असे शास्त्रात वर्णन आहे . अल्प प्रमाणात वापरले तरच हितकारक आहे असा त्याचा अर्थ . चरक संहिता ज्या काळात लिहिली गेली त्या काळात ना टाटा सॉल्ट होते ना पतंजली . . त्यांनी पंचलवण (सैंधव त्यातीलच एक ) डोळ्यासमोर ठेवून हा नियम लिहिला आहे .

त्यामुळे मग सैंधव चालते का ? हा प्रश्नच गैरलागू होतो . मीठ हे उष्ण आणि तीक्ष्ण गुणाचे असते . आपण लोणच्याच्या बरणीवर पाहिलेले मोहरी तेल समान गुणाचे आहे . आगीत कापूर टाकल्यावर जे होते तेच लोणच्याच्या बरणीत होत असते . बाकीचे घटक – मिरची , पापडखार , मेथी इत्यादी त्याची दाहकता वाढवतात .

लोणचे घरी केले किंवा विकतचे असले तरी ते दीर्घकाळ टिकण्यासाठी भरपूर मीठ घालावे लागतेच !
रोज जेवणात लोणचे खाल्ल्याने रक्त आणि पित्त यातील दाह वाढून त्वचा रोगांची उत्पत्ती होते !
स्किन डिसीज चा पहिला नियम लोणचे बंद . . !
क्वचित कधीतरी लोणचे खायला हरकत नाही .
रोजच्या स्वयंपाकात मीठ वापरणे चूक नाही .
दोन्हीचा अतिरेक मात्र सौंदर्य झाकोळतो !
जिभेचा हट्ट आणि ५० % सवलतीचा मोह आरोग्याला ग्रहण लावतो हे मात्र नक्की !
वैद्य . अंकुर रविकांत देशपांडे
एम डी (आयुर्वेद )
आरोग्य मंदीर
सांगली – पुणे
7276338585

साभार
हाजी हैदर शैख

SHARE THIS

RELATED ARTICLES

LEAVE COMMENT