सांस्कृतिक विभाग साठी राज्य शासन वतीने दर वर्षी कोट्यावधी रुपए खर्च होत आहे ते कोणाच्या निधि तूंन? सवाल
मुंबई
प्रतिनिधि
महाराष्ट्र शासनाच्या वतीने सांस्कृतिक कार्य विभागाचा 80 टक्के निधी ब्राह्मण जातीच्या साहित्यिक, लेखक, साहित्य संस्था, संगीत संस्था यावर खर्च होतो.
महाराष्ट्र सरकार दरवर्षी
1) अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ,
2) विदर्भ साहित्य संघ, नागपूर,
3) मराठवाडा साहित्य परिषद, औरंगाबाद,
4) महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे ,
5) मुंबई मराठी साहित्य संघ, मुंबई,
6) कोकण मराठी साहित्य परिषद,रत्नागिरी ,
7) दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, कोल्हापूर ,
अशा 7 संस्थाना दरवर्षी १० लाख प्रत्येकी असे ७० लाख रुपये वाटते.
मराठी साहित्य संमेलन भरविण्यासाठी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळास दरवर्षी ५० लाख रुपये देते.
या दरवर्षीच्या १२० लाखाचा लाभार्थी समाज कोणता आहे ?
विंदा करंदीकर, श्री.पु.भागवत यांच्या नावाने दरवर्षी १० लाख रुपयाचे पुरस्कार सरकार वाटते.
प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार ५ लाख,
अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार ५ लाख,
पं.भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार ५ लाख,
पं.भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत संस्थाना सहायक अनुदान १२ लाख,
पं.भीमसेन जोशी संगीत शिष्यवृत्ती दरवर्षी ७.२० लाख,
लता मंगेशकर पुरस्कार ५ लाख, याशिवाय इतर सुप्रसिद्ध व्यक्तींच्या नावाने अन्य काही लाखांचे पुरस्कार असे कोट्यावधी रुपयाची खैरात सरकार दरवर्षी करते.
पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीसाठी दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करते.
ही सर्व कोट्यवधी रुपयाची रक्कम कोणत्या समाजाच्या विकास निधीतून खर्च करण्यात येते ? व त्याचा लाभ कोणत्या समाजाला मिळतो ?
शासनाने यावर्षी आजादी का अमृत महोत्सव कार्यक्रमासाठी ५०० कोटीच्या खर्चाची तरतूद केली आहे.
शिवनेरी किल्ले परिसर विकासासाठी यावर्षी २४ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.
यावर्षी राज्यातील सहा गड/ किल्यांच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे.
हा कोट्यवधी रुपयाचा कोणत्या समाजाच्या विकास निधीतून खर्च करण्यात येणार आहे ?
जर सरकार हा सर्व खर्च पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून करीत आहे. तर मग शौर्यदिन अभिवादन कार्यक्रमाचा खर्च व भीमा कोरेगाव परिसर विकासाचा खर्च अनुसूचित जाती विकास योजनेच्या निधीतून का केला जाणार आहे ?
याचे उत्तर मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी आणि महाविकास आघाडी सरकार मध्ये सामील कॉंग्रेस पक्षाने दिले पाहिजे.
साभार;निर्मल कुमार