समस्त महाराष्ट्र चा उद्धव ठाकरे याना आशीर्वाद,कोंकण खेड़ सभेत लोकांची तूफान गर्दी
जनतेचा आशीर्वाद शिंदेंना नव्हे, तर उद्धव ठाकरेंना असल्याचे प्रत्यंतर आज कोकणात खेडमधील सभेच्या निमित्ताने आले. खेडमध्ये उपस्थित असलेल्या काही जणांकडून मिळवलेल्या माहितीनुसार, अनेक वर्षांनी असा तुफान प्रतिसाद कोकणातील किंवा खेडमधील सभेला मिळाला. दिवसभर खेड व आसपासच्या परिसरात पूर्णपणे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा माहोल होता. ऐन भरात असताना जसा मावळ्यांचा जोश दिसायचा, तसाच जोश काल दिसून आला.
मावळे आणि लोक अक्षरश: पेटून उठलेले दिसले.
उद्धवजींप्रमाणेच भास्कर जाधव, संजय कदम, सुषमा अंधारे यांच्या भाषणांनाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत होता. शिंदे गटास निवडणूक आयोगाचा आशीर्वाद असला, तरी सामान्य जनतेचा आशीर्वाद कोणाकडे आहे, याचे स्पष्ट संकेत कालच्या सभेत मिळत होते.
श्रोत्यांची प्रचंड गर्दी पाहुंन असा आभास पहिल्यांदा परत्यक्षत पहाता उद्धव ठाकरे ची ताकद चे विस्मरण घडले. केवळ सूडभावनेतून, फोडाफोडी करून, पळवून आणून आणि बळेबळे एखाद्या माणसाला सत्तेवर बसवले, तरी तो केवळ सत्ताधीश आहे, म्हणून सामान्य लोक त्याला पाठिंबा देत नाहीत, हा इतिहास आहे!-
साभार
हेमंत देसाई