शिवसैनिकानो, आज ना उद्या सारे ठाकरे ना सोडून गेलेले आमदार मतदार संघात येतिल आणि शिव सेना पदाधिकारी व शिव सैनिकाना भावनिक साद घालतील

आज ना उद्या सर्व बंडखोर आमदार आपआपल्या मतदार संघात येतील आणि शिवसेनेच्या पदाधिकारी व शिवसैनिकांना भावनिक साद घालतील, खोटे नाटे सांगून फसवायला पाहतील , आमच्यावर अन्याय होत होता, आम्हाला उद्धव साहेब भेट देत न्हवते, फंड देत न्हवते , हिंदुत्ववादी सरकार न्हवते आणि आपल्या परीने खोटे सांगून सर्व सामान्य शिवसैनिकांना गंडवायला पाहतील.

पण माझ्या कट्टर शिवसैनिकानो तुम्हाला एक सांगतोय या गद्दार आमदारांच्या आणि त्यांच्या बगल बच्चयांच्या भूलथापांना बळी न पडता त्यांना सरळ एक प्रश्न विचारा.तुम्हाला विजयी करण्यासाठी आम्ही शिवसैनिकांनी जीवाचे रान केले , मग जर तुमच्यावर अन्याय होत होता तर तुम्ही आम्हाला कधी यापूर्वी बोलला का नाही?, 40आमदार फुटून गेलात त्या अगोदर एकदा सर्व मिळून उद्धव साहेबांच्या समोर का बसला नाही… त्यावेळी जर तुमचं ऐकले नसते तर तुम्ही कोणताही निर्णय घ्यायला समर्थ होता.

फंडाचे म्हणाल तर याआधी कधीच फंड मिळाला नसेल इतका फंड आपल्या मतदार संघात मिळाला आहे, तशी सरकार दरबारी आकडे आहेत मग फंड कोणता कमी पडला,?
उद्धव ठाकरे हे ठाकरे घराण्याचे 56 वर्षाच्या इतिहासात पहिल्या वेळी कोणी तरी राजकारणात उतरले व मुख्यमंत्री झाले तर अडीज वर्षातच तुमच्या पोटात दुखायला लागले आणि तुम्ही त्यांना मनस्ताप देऊन , गद्दारी करून मुख्यमंत्री पदावरून पायउतार होण्यासाठी भाग पाडलेत, आतापर्यंत ठाकरे घराण्याने तुम्हा लोकांना नगरसेवक, आमदार केले तुमच्या मुलांना पण राजकारणात यशस्वी केले .

तुम्ही तुमच्या सात पिढ्या बसून खातील इतकी माया जमा केलीत आणि ठाकऱ्यांनी स्वतः काहीच घेतले न्हवते , पहिल्यावेळी आमदारकी, मुख्यमंत्री पद घेतले तर तुमची का पोट दुःखी वाढली?
आम्ही शिवसैनिक कसल्याही पदाची अपेक्षा न ठेवता शिवसेना पक्षप्रमुख सांगतील त्याला व टिळा लावतील त्या दगडाला त्याला देव मानून निवडून आणले , डोक्यावर घेतले , पण जर तेच दगड देव पण सोडून गद्दार झाले तर त्यांना देव न मानता विसर्जित करू,
हे फुटीर आमदार सांगतील आम्ही शिवसैनिक आहोत शिवसेनेचे आमदार आहोत तर हे झूट बोलत आहेत हे ओळखा..
यांची शिवसेना मग उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची कोणती सेना आहे?

शिवसैनिकांना विनंती आहे आता हे गद्दार आमदार आपल्या स्वार्थासाठी, कोणी खूप काळा पैसागोळा करून बसलेत म्हणून ईडी ला CBI, इंनकम टॅक्स ला घाबरून, तर कोणी 50 करोड च्या आमिषाला बळी पडून मूळ शिवसेना पक्षाला तिलांजली देण्याचे हे काम करत आहेत,
भाजपच्या वतीने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वर व शिवसेना परिवारावर गलिच्छ आरोप केले जात होते तेव्हा हे स्वाभिमानी आमदार गप्प बसून होते काही दोन चार नेते सोडले तर हे सर्व घाबरून गप्प बसून होते कारण हे काही बोलले तर यांच्यावर धाड पडेल कातडी बचाव आमदार आता वाघाच्या डरकाळ्या फोडतील तेव्हा त्यांना वेळीच सत्य परिस्थिती दाखवून गप्प करा.

आपली शिवसेना , पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली नक्कीच पुन्हा एकदा भरारी घेईल फक्त उद्धव साहेबांना आपल्या प्रामाणिक कट्टर सैनिकांच्या पाठबळाची गरज आहे..
नेते येतात गब्बर होतात आणि फुटतात.
म्हणून गेले ते कावळे आणि राहिले ते मावळे .
शिवसेना पुन्हा एकदा फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून भरारी घेईल ..
तूर्तास इतकेच ।
जय शिवराय, जय जिजाऊ, जय भीम.
जय हिंद, जय महाराष्ट्र!

SHARE THIS

RELATED ARTICLES

LEAVE COMMENT