मुंबई नल बाजार मर्डर केस बद्दल सविस्तर माहिती , काय आणि कसे घड़ले खुनाचे प्रकरण?

मुंबई प्रतिनिधि
यासीन कुरेशी

काल दिनांक ०५.०३.२०२२ रोजी रात्रि. ९.४० चे सुमारास ऐसे प्रकरण घडले गुन्ह्याची हकीकत खालिल प्रमाणे

1) केसचा प्रकार खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस मालवणी येथुन ताब्यात घेतलेबाबत.
2) जे.जे.मार्ग पोलीस ठाणे
गु.र.क्र. 29/22, कलम 302,307,323,504,506,201 भा.दं.वि. सह 37(1)/135 मपोका
3) ताब्यात घेतलेल्या आरोपीतांची संख्या- 01
4) ताब्यात घेतलेल्या आरोपीताचे नाव- xyz , वय 25 वर्षे.
5) गुन्हयाची थोडक्यात हकीकतः-

दिनांक 05/03/22 रोजी 09.40 वाजेच्या सुमारास मटका गल्ली कॉर्नरच्या जवळ, शाफी मस्जिद समोर, इरेस्किन रोड, नळबाजार, मुंबई या ठिकाणी इसम नामे बाबूजी कुरेशी, वय 55 वर्ष व त्यांचा मुलगा छोटू कुरेशी, वय 30 वर्ष या दोघांना इसम नामे आरोपीत इसम, वय 25 वर्ष याने फ्रुट विक्रीच्या पैशांच्या देवाण-घेवाण या कारणावरून चाकू मारून गंभीर जखमी केले होते.

त्यापैकी इसम नामे बाबूजी कुरेशी, वय 55 वर्षे हा मयत झालेला आहे आणि छोटू कुरेशी, वय 30 वर्षे हा गंभीर जखमी असून त्यास जे जे रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पाहिजे हा घटनास्थळावरून पळून गेलेला होता.

केलेली कारवाई- सदर गुन्हा घडल्या बाबत व आरोपी मालवणी परिसरात आले बाबत गुप्त बातमीदारा मार्फत प्रभारी पोलीस निरीक्षक विनायक चव्हाण यांना माहिती मिळाली.

त्यानुसार, कक्ष 11 चे API अभिजीत जाधव, ASI कांबळे, पोह नावगे व पोना खताते असे पथक मालवणी येथे जाऊन कच्चा रस्ता, मालवणी, मालाड पश्चिम, मुंबई येथून पाहिजे आरोपी हा त्याचे मुळ गाव उत्तर प्रदेश येथे पळून जाण्याच्या तयारीत असताना रिक्षामधून शिताफीने ताब्यात घेतले.

त्यानंतर कक्ष कार्यालय येथे आणून त्याच्याकडे सविस्तर चौकशी केली असता त्याचा सदर गुन्ह्यांमध्ये सहभाग निष्पन्न झाल्याने त्याची वैद्यकीय तपासणी करुन पुढील कारवाई करीता जे.जे. मार्ग पोलीस ठाणे यांच्या ताब्यात दिलेले आहे.

SHARE THIS

RELATED ARTICLES

LEAVE COMMENT