मरण पावले वडीला ना जीवंत करने साठी दोन महीने चे बालकाचे अपहरण आणि नंतर अंध श्रद्धा बली देने चा कट होता, पोलिसानी लावला छड़ा

वडिलांना जिवंत करायचंय म्हणुन २ महिन्यांच्या बाळाचं अपहरण करुन बळी देण्याचा प्रयत्न….

नवी दिल्ली: दिल्लीत एका दोन महिन्याच्या बाळाचा बळी देण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
दिल्लीच्या दक्षिण पूर्व जिल्ह्यातील अमर कॉलनी पोलीस स्टेशनच्या पथकाने २ महिन्यांच्या निष्पाप मुलाच्या अपहरणाच्या खळबळजनक प्रकरणाची उकल केली आहे. याप्रकरणी कोटला मुबारकपूर येथून २४ तासांत एका महिलेला अटक केली आहे.

या महिलेने सांगितले की तिने मुलाचे अपहरण केले होते जेणेकरून ती मुलाचा बळी देऊन आपल्या मृत वडिलांना जिवंत करू शकेल.
हे ऐकून पोलीसही हादरुन गेले होते.

अंधश्रद्धेपोटी महिलेने हे सर्व केल्याची माहिती आहे.
दक्षिण पूर्व दिल्लीच्या डी.सी.पी. ईशा पांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार,
१० नोव्हेंबर २०२२ रोजी दुपारी ४ वाजता अमर कॉलनी पोलीस ठाण्याला माहिती मिळाली की गढी गावातून एका अज्ञात महिलेने दोन महिन्यांच्या नवजात बालकाचे अपहरण केले आहे

यानंतर अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला.
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन एस.आय. राजिंदर सिंग,
एच.सी. रविंदर गिरी,
एच.सी. शेर सिंग,
एच.सी. सचिन सरोहा,
एच.सी. नीरज कुमार,
इन्स्पेक्टर प्रदीप रावत यांची टीम तयार करण्यात आली. तपासादरम्यान पीडितेने सांगितले की,
अपहरण करणारी महिला त्यांना सफदरजंग रुग्णालयात भेटली आणि बाल संगोपनासाठी काम करणाऱ्या एन.जी.ओ.ची सदस्य म्हणून तिने तिची ओळख सांगितली.

तिने आई आणि बाळाला मोफत औषध तसेच समुपदेशन करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर नवजातच्या पुढील चाचण्या करण्याच्या बहाण्याने ती त्यांच्या संपर्कात राहिली.
त्यानंतर ९ नोव्हेंबर २०२२ ला आरोपी महिला नवजात बालकाची तपासणी करण्याच्या बहाण्याने गढी गावात त्यांच्या घरी आली,
त्यानंतर १० नोव्हेंबर २०२२ ला ती पुन्हा त्यांच्या घरी आली.

यानंतर तिने आईला आपल्या बोलण्यात गुंतवले आणि बाळाला बाहेर नेण्यासाठी मनवले.
जेव्हा ती मुलाला घराबाहेर घेऊन जात होती तेव्हा आईने तिच्या २१ वर्षीय भाचीला महिलेसोबत जाण्यास सांगितले.
त्यानंतर अपहरणकर्ती महिला भाची रितूसह बाळाला स्विफ्ट कारमधून घेऊन गेली.
वाटेत अपहरणकर्त्या महिलेने रितूला थंड पेय पिण्यास दिले, ज्यामुळे ती बेशुद्ध झाली.
नंतर, अपहरणकर्त्या महिलेने गाझियाबादच्या रस्त्यावर रितूला फेकले.

रितूने शुद्धीवर आल्यानंतर तिच्या कुटुंबीयांना बाळाचं अपहरण झाल्याची माहिती दिली.
यानंतर पोलिसांना याबाबतची माहिती देण्यात आली. तपासादरम्यान, आजूबाजूचे सी.सी.टी.व्ही. फुटेज तपासण्यात आले.
सी.सी.टी.व्ही. फुटेज तपासल्यानंतर अपहरणकर्त्या महिलेच्या कारचा नोंदणी क्रमांक सापडला आणि त्यावरून तिचा पत्ता सापडला.
पोलिसांनी तात्काळ तिच्या घरावर छापा टाकला पण ती सापडली नाही.

त्यानंतर शुक्रवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास अपहरणकर्ती महिला आर्य समाज मंदिर, कोटला मुबारकपूर, दिल्लीजवळ येणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर आरोपी महिलेला पकडण्यात आले आणि बाळाला सुखरुप वाचवण्यात पोलिसांना यश आलं.
श्वेता (२५) असे अपहरणकर्त्या महिलेचं नाव असून ती कोटला मुबारकपूर गावातील रहिवासी आहे.

तपासात धक्कादायक माहिती उघड

चौकशीत आरोपी श्वेताने सांगितलं की
ऑक्टोबर २०२२ मध्ये तिच्या वडिलांचा मृत्यू झाला होता. अंत्यसंस्काराच्या वेळी, तिला कळले की समान लिंगाच्या नवजात अर्भकाचा बळी दिल्याने तिचे वडील पुन्हा जिवंत होऊ शकतात.
या अंधश्रद्धेला बळी जाऊन तिने परिसरात नवजात मुलाचा शोध सुरू केला.


तिने सफदरजंग रुग्णालयात असं दाखवलं की ती नवजात बालकांना आणि मातांना मदत करणाऱ्या एन.जी.ओ.त काम करते.
लोकांचा विश्वास जिंकण्यासाठी ती अनेकदा नवजात बालक आणि तिच्या कुटुंबाला भेट देत असे.
१० नोव्हेंबर २०२२ रोजी तिने नवजात मुलाचे अपहरण केले.

SHARE THIS

RELATED ARTICLES

LEAVE COMMENT