मनसे विभाग अध्यक्ष विरुद्ध बलात्कार चा गुन्हा, काय आहे नक्की लफड़? कुट्ठ घडल ही घटना?

मनसेच्या एका 33 वर्षीय विभाग अध्यक्षावर बलात्काराचा गुन्हा वि. प. मार्ग पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे.

आरोपीने 42 वर्षीय महिलेला येणाऱ्या मनपा निवडणुकीत तिकीट मिळवून देण्याचे आमिष दिल्याचा आरोप पीडितेने तक्रारीत केला आहे. तसेच, सप्टेंबर २०२१ ते जुलै २०२२ दरम्यान विविध आमिष दाखवून विविध ठिकाणी शारिरीक संबध ठेवत फसवणूक केल्याची तक्रार पीडितेने केली आहे.

या तक्रारीनंतर पोलिसांनी वृशांत वडके यांना अटक केली आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत. पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीविरोधात भारतीय दंड संहिता कलम 376, 500 आणि 420 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

संबंधित महिलेने काही दिवसांपूर्वी मनसेच्या वरिष्ठांची भेट घेऊन घडलेला प्रकार सांगितला होता. या तक्रारीनंतर पक्षाने वृशांत वडके यांच्यावर कारवाई केली होती. चार दिवसांपूर्वीच पक्षाने त्यांचा राजीनामा घेतला होता.
आरोपी हा गिरगावमध्येच वास्तव्यास आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास करण्यात येत आहे. मनसे पदाधिकाऱ्याने केलेल्या कृत्यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे.

मागिल फेब्रुवारी महिन्यात विविध उपक्रमात, तसेच वेळोवेळी राबविण्यात आलेल्या कार्यक्रमात केलेल्या कार्याची दखल घेत मनसेच्या मलबार हिल विधानसभा विभाग अध्यक्षपदी वृशांत वडके यांची नियुक्ती करण्यात आली होती.

संवाद

यासीन कुरेशी

SHARE THIS

RELATED ARTICLES

LEAVE COMMENT