बिलकिस बानो ला विसरला असाल पण ती दुर्दैवी कथा नायिका,तीचा विसर अशक्य?
तुम्ही बिल्कीस बानो ला विसरला असाल, पण ती दुर्दैवी कथानायिका एवढ्या पटकन् विस्मरणात जाणं शक्य नाही
गोध्रा-दंगल पेटली तेव्हा ती अवघी १९ वर्षांची होती.
नवरा आणि एक मुलगी. आर्थिक परिस्थिती यथातथाच.
दंगलीच्या वार्ता तिच्या कानांवर आल्या, तेव्हा काहीतरी अघटित घडत असल्याची चाहूल तिला लागली.
तिचं माहेर तेथून जवळच होतं… तिनं मुलीला सोबत घेतलं. गावातील आणखीही काहीजण तिच्यासोबत गाव सोडण्याच्या विचारापर्यंत आले.
१०-११ जण बिल्कीससोबत भीतीपोटी गाव सोडून निघाले. त्यांचं दुर्दैवही त्यांच्यासोबतच निघालं
काही अंतर जाताच अचानक २०-२५ जणांच्या शस्त्रधारी जमावानं त्यांना घेरलं.
आणि सुरु झाली बानो आणि तिच्या सोबतच्या सगळ्यांची लांडगेतोड. बलात्कार, मारहाण, आणि हत्त्या.
बानोवर कितीजणांनी बलात्कार केला, हे नंतर तिलाही आठवेना. कारण, होणाऱ्या अत्त्याचारानं ती बेशुद्ध पडली होती.
शुद्ध आल्यावर तिनं पाहिलं… तिच्या सोबत होते, त्या सगळ्यांनाच जमावानं ठार केलं होतं.
तर, तिच्या छोट्या मुलीला दगडावर आपटून मारलं होतं सर्वच काही अमानुष.
पीड़िता बिल्किस बानोला चालता येत नव्हतं. अंगावरील कपड्यांच्या चिंध्या झाल्या होत्या खुरडत – सरपटतच ती तेथून निघाली. फर्लांगभर अंतरावर एक झोपडी दिसली. ती कशीबशी तेथे पोहोचली.
झोपडीतील आदिवासी बाईनं तिला आधार दिला. तिला दुसरे कपड़े दिले. रात्रभर स्वतःकडेच ठेवून घेतल.
काही दिवसांनी बानोला काही सेवाभावी कार्यकर्त्यांनी एका पुनर्वसन केंद्रात पोहोचवलं . तेव्हा पासून बानोची जगण्याची आणि अत्त्याचाराविरुद्ध लढण्याची लढाई सुरु झाली.
त्यात पदोपदी अडथळे आले.पोलीस, डॉक्टर्स, नोकरशाही आणि न्यायालय शी सामोरे जाव लागले
पण बानो नाउमेद झाली नाही. न्याय साठी लढतच राहिली.
अखेर प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचलं.
न्यायालयानं ११ आरोपींना आमरण जन्मठेपेची शिक्षा सुनावली आणि बानोला घर, नुकसान भरपाईपोटी मोठी रक्कम आणि स्थायी नोकरी देण्याचा आदेश दिला.
बानोचं प्रकरण तिला न्याय मिळून इथं संपलं !
परवाच स्वातंत्र्यदिनानिमित्त आपले शेठ लाल किल्ल्यावरून भाषण करताना, स्त्री सन्मान, स्त्री प्रतिष्ठेवर प्रवचन देत होते, आणि तिकडे त्यांच्याच गुजराथमध्ये.त्यांचे मुख्यमंत्री त्या बलात्कार करणाऱ्या ११ नराधमांना शिक्षा-माफीची सवलत देत, त्यांची जेलमधून कालच सुटका करत होते हे दुर्दैव म्हना .
आता म्हणू नका की, CM नं PM ना न सांगताच असा निर्णय घेतला असावा, म्हणून.
अशी आहे शेठच्या स्त्री-सन्मानाची चित्तरकथा.
संवाद
निसार शैख
समाजमाध्यमातून साभार.