कांग्रेस नेते सुशील कुमार आणि कन्या आमदार प्रणीति शिंदे भाजपात सामिल होणार?

विशेष
प्रतिनिधि

सुशीलकुमारांसह आ. प्रणिती शिंदे भाजपच्या वाटेवर ? मग ती चर्चा अशी एकाएकी का सुरू झाली. तीही भाजपच्या नावानेच का. तसेच हल्लीच्या काळात सोलापुरात भाजप नेत्यांच्या सुशीलकुमारांच्या घरी वाढलेल्या वार्‍या कशाचे द्योतक आहे. Sushil Kumar Shinde

निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पार्टीकडून अन्य पक्षातील बड्या नेत्यांना फोडण्याची मोहीम सुरू होत असते, हा आजवरचा इतिहास आहे. त्याची चाहूल लागावी अशी घटना नुकतीच सोलापुरात घडली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांना व तीन टर्म आमदार असलेल्या त्यांच्या कन्या प्रणिती यांना भाजपने ऑफर दिल्याचा गौप्यस्फोट सुशीलकुमारांनी नुकताच अक्कलकोट तालुक्यातील एका हुरडापार्टी कार्यक्रमा दरम्यान केला. यातून राज्याचे राजकीय वातावरण ढवळून निघाले.

लातूर : भाजप आणि सुशीलकुमार व आ. प्रणिती शिंदे यांच्यात काहीतरी शिजतेय. कुठेतरी आग लागल्याशिवाय का धुराचे लोट वर दिसतात. अगदी तसेच आजवर कधीच सुशीलकुमारांविषयी अशी पक्षांतराची चर्चा झाली नाही.
दरम्यान, त्याच दिवशी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सोलापुरात भाजप सुपर वॉरिअर बैठकीसाठी आले होते. तेव्हा ते म्हणाले आम्ही शिंदे पितापुत्रीस ऑफर वगैरे दिलेली नाही. परंतु आमच्या पक्षात अन्य पक्षातील जुना जाणता नेता येत असेल व त्यातून आमचा पक्ष वाढत असेल तर आम्ही थोडं ना म्हणणार आहोत.

त्यानंतर लगेचच सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकात पाटील हे सोलापुरात होणार्‍या विभागीय नाट्य संमेलनाच्या निमंत्रणाची पत्रिका देण्यासाठी सुशीलकुमारांच्या घरी गेले. त्यानंतर त्यांनीही माझी व सुशीलकुमारांची सांस्कृतिक भेट होती. यावेळी राजकीय चर्चा झाली नाही असे सांगितले. पण त्याचबरोबर राजकीय भेट गुप्त असते, ती मीडियाला वर्षानुवर्षे कळतही नाही. आत्ता आमच्या भेटीत सुशीलकुमारांनी नितीन गडकरी यांची आठवण काढली. गडकरी हे मित्र आहेत, असेही सांगितले.

तिकडे दुसर्‍या बाजूला आ. नितेश राणे आणि आ. गिरीश महाजन यांनी सुशीलकुमार अथवा आ. प्रणिती भाजपमध्ये आल्यास आम्ही त्यांचे स्वागतच करू, असा उल्लेख मीडियाशी बोलताना केला. काय आहे प्रकरण?

साभार: मोहमद दादासाहब पटेल

SHARE THIS

RELATED ARTICLES

LEAVE COMMENT