औरंजेब एक दुर्लक्षित व ब्राम्हण द्वारे बदनाम केलेला उत्तम सम्राट:डॉक्टर दाभाड़े
डॉक्टर दाभाड़े बीड
औरंगजे़ब एक दुर्लक्षित व ब्राह्मणांनी बद़नाम केलेला एक उत्तम सम्राट.
एक न पटनारे न रूचणारे पण खरेखुरे वास्तव
औरंगजे़ब एक वास्तव..मोगल वंशात लक्षात राहण्याजोगे व कर्तबगार असे सात सम्राट झाले. बाबर, हुमायून, अकबर, जहांगीर, शहाजहान, औरंगजे़ब व बहादूर शहा ज़फर. पैकी औरंगजे़ब हा सर्व भट्ट ब्राम्हण पेशव्यांनी अतिशय वाईट सम्राट चित्रीत केला आहे.
प्रत्यक्षात औरंगजे़ब हा सर्वात हुशार समझदार कसलेला सेनापती. अत्यंत महत्वाकांक्षी, राजकारण धुरंदर, चाणाक्ष, कुशल राजकारणी, उत्तम प्रशासक, अत्यंत कल्पक, जागरूक, सतत दक्ष असणारा, राज्याच्या हितासाठी कसलीही तडजोड न स्विकारणारा.
एखाद्या प्रश्नाचे मुळ शोधून त्या प्रश्नांचे समुळ नष्ट करणारा, भौतिक सुखाची सुतराम ही अपे
क्षा न करणारा हा सम्राट विरळाच.
औरंगजे़ब आपल्या खाजगी जीवनात अत्यंत आदर्शवादी होता. सगळे सम्राट कमालीचे विलासी, चंचल, सूखलोलूप, रंगेल, कमालीचे भोगवादी दिसून येतात. परंतु औरंगजे़ब हा अत्यंत आदर्श सम्राट होता.
औरंगजे़बास कोणतेही व्यसन नव्हते. त्याने कधीही मद्यप्राशन केले नाही. जुगार खेळला नाही, संगीत बारी केली नाही. औरंगजे़बाच्या कार्य काळात व राजवटीत संपूर्ण राज्यात नशाबंदी होती. संगीत, नाचगाणे, तमाशा नाटक शाळा या सर्व बाबींना कटाक्षाने बंदी होती. स्त्रीचा विनयभंग केल्यास हात कलम करण्याची शिक्षा होती. औरंगजेबाने स्वतःच्या मुलांस विनयभंग केल्याबद्दल पंचवीस फटक्यांची शिक्षा केली होती.
देशद्रोहाबद्दल स्वतःच्या मुलांस मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा केली होती. महिलांचा वा स्त्री जातीचा अतिशय सन्मान करणारा औरंगजे़बासारखा दुसरा सम्राट शोधूनही सापडणार नाही.
सम्राटांच्या अनेक पत्नी, अनेक रखेल्या असत. परंतु औरंजे़बाची एकही रखेल नव्हती. तसेच त्याच्या चार बायका होत्या, त्यातील दोन राजकिय तडजोड होती. या चारही बायकांना त्याने अतिशय सन्मानाने वागविले. चार पैकी दोन बायका हिंदू होत्या. या हिंदू पत्नीं पैकी एका पत्नीचा औरंगजे़बाच्या गैरहजेरीत, औरंगजे़बाच्या मामाने हिंदू पत्नी म्हणून विनयभंग केला असता औरंगजे़बाने या मामास कधीही माफ केले नाही व त्याच्या कडील असलेले सर्व अधिकार काढून घेतले व त्यास अत्यंत नामुष्कीची जिंदगी आयुष्यभर जगावी लागली. औरंगजेब हा स्वतःचा खर्चही स्वकमाईतून करत असे. त्याने कधीही उच्च दर्जाचे शामीयाने वापरले नाहीत. एक बादशहाचा शामियाना फाटलेला असे. छानशोकी करणे औरंगजे़बास कधीच मान्य नव्हते. औरंगजे़बाने आपल्या प्रदिर्घ राजवटित मद्य प्राशन व दुर्व्यसनावर कायम बंदी ठेवली.
अतिशय साधी राहणी, अतिशय साद़गी, पाच वेळा नमाज पढने. आपला उदर निर्वाहही टोप्या विकूनच करत असे. सगळ्या सम्राटांच्या अतिशय भव्य व अतिविशाल अशा कबरी मक़बरे मजा़रे आहेत. सम्राटांनी ताजमहाल सारखे मक़बरे बांधून जनतेचा पैसा वाया घातला असे औरंगजे़बाचे म्हणणे होते, म्हणून मृत्यू पुर्वी माझी क़बर अत्यंत साधी बांधावी असा आदेश काढून ठेवला होता. केवळ बारा रूपये खर्चून औरंगजे़बाची क़बर त्यांच्या गुरूजीच्या क़बरीच्या परिसरात बांधण्यात आली. इंग्रज गवर्नर लाॅर्ड कर्जनने या क़बरीस संगमरवर बसवून योग्य सन्मान केला.
620 जिल्हे असलेल्या विशाल साम्राज्याच्या सम्राटाची ईतकी साधी क़बर जगात कुठेही पहायला मिळणार नाही.
औरंगजे़ब मराठ्यांचे राज्य नेस्तनाबूत करण्यासाठी दक्षिणेत उतरला असे सगळे समजतात कारण भट्ट ब्राम्हण पेशव्यांनी तसे लिहून ठेवले, पण तसे बिल़कुल नाही. प्रत्यक्षात औरंगजे़बाला सार्वभौम मोगल राज्य स्थापन करण्याची महत्वाकांक्षा होती. त्यामुळे दक्षिणेतील कुतूबशाही व अदिलशाही त्याच्या नजरेत होती. दक्षिणेत उतरल्या नंतर प्रथम त्याने या दोन्हीही शाह्या नष्ट केल्या, ज्या की मुस्लिम राजवटी होत्या. मग त्याने मराठा राज्या कडे लक्ष वळवले .
छ. संभाजी महाराजांच्या ब्राम्हणी मनूस्मृती नुसार मृत्यू नंतर औरंगजे़बाच्या ताब्यात संभाजीचे संपुर्ण कुटूंब आले. 18 वर्ष या कुटूंबाचा अतिशय काळजीने प्रतिपाळ केला. संभाजी महाराजांचे चिरंजीव छ. शाहूचे उत्तम संगोपण केले. एक सक्षम राजपुत्र घडवला. संभाजीचे कुटूंबाची देखभाल स्वमुलीच्या काळजीने केली. हे कुणी इतिहासात सांगत नाही.
तो द्वेष्टा, क्रूर, कपटी असता तर त्याने छ. संभाजीच्या कुटूंबाची सहज कत्तल केली असती . औरंगजे़ब एक योद्धा होता, सेनापती होता, बादशहा होता. त्याचे आचरण कमालीचे स्वच्छ होते, म्हणूनच तो सम्राट होता.
हिंदू धर्मातील अतिशय रानटी व क्रुर सतीच्या चालीचा तो कट्टर विरोधक होता. सतीच्या चालीला विरोध केला म्हणून हिंदू धर्म ब्र्हाम्मण ठेकेदारांनी आमच्या धर्मात ढवळाढवळ करतो म्हणून आरडा ओरडा केला. औरंगजे़बाने मनूस्मृतीतील अनेक अमानवी चालींचा, रितीचा विरोध केला व त्या बंद पाडल्या. ब्राह्मणांच्या जाचक वर्चस्वाला कडाडून विरोध केला म्हणून ब्राह्मण वर्ग औरंगजेबाला दोष देत असतो व आजतागायत औरंगजेबाला हिंदूचा दुश्मन ठरवत आला आहे. ज्यांने ब्राम्हणी मनूस्मृतीत हस्तक्षेप करुन पेशव्यांशी शत्रुत्व वैर घेतले त्याला ब्राम्हणांनी हिंदूंचा शत्रू दाखवण्यात यशस्वी झाले.
कित्येक विधवांना सती जाण्यापासुन रोखणारा जगातील पहिला सम्राट औरंगजे़ब आहे. पुढे 1829 मध्ये कायदा करून हि सतीची मानव जातीला कलंक असलेली चाल लाॅर्ड बेटींकने बंद केली व हिंदू संस्कृतीला चपराक बसली.
आजही जसे काही हिंदूना वा हिंदू महिलांना मंदिरात प्रवेश करू दिला जात नाही, तसेच त्याकाळीही हे धर्म ठेकेदार हिंदूंनाच मंदिरात जावू देत नसत. यामुळे औरंगजे़बाने काही मंदिराचां विध्वंस याच कारणाने केला. कारण मंदिरावर या भटांचा ताबा होता. सगळी संपत्ती हे ब्राह्मण मंदिरात साठवून ठेवत असत. ती संपत्ती सामान्य जनतेची असल्याने ती जप्त करून सरकारात जमा करण्यात आली.
सध्याचा औरंगाबाद ते वेरूळ घृष्णेश्वर हा रस्ता औरंगजे़बाने तयार केलेला आहे. औरंगजे़बाच्या हिंदू पत्नीला घृष्णेश्वर दर्शन घेण्यासाठी हा रस्ता बनवला गेला होता या हिंदू पत्नीला देवदर्शनास मज्जाव केल्याने ब्राह्मण लोकांना औरंगजेबाने अतिशय कडक शिक्षा केली होती.पण हे कुणीही सांगत नाही. औरंगजेब कट्टर मुस्लिम समर्थक होता हे ब्राम्हणी लेखनीतून नाटकातून पुरंदरी पोवाड्यातुन वारंवार दर्शविल्या जाते ते चुकीचे आहे. आणि ब्राह्मण म्हणत होते कि शिवाजी होते म्हणून हिंदू वाचले, नसता शिवाजी तर सर्वांची सुंता झाली असती. असे चुकीचे सांगितले लिहिले जाते कारण मोगल साम्राज्यात औरंगजेबाच्या काळात 88% टक्के हिंदू होते.
छ. शिवरायांचे राज्य महाराष्ट्रात होते. उर्वरित भारतात मोगलांचे राज्य होते. आजही भारतात 88% हिंदू आहेत.
उलट विसाव्या शतकात बहुसंख्य हिंदूंनी हिंदूधर्माला सोडचिठ्ठी दिली ब्राम्हणांच्या वर्णव्यवस्थेला छळाला कंटाळून . निजामाचे राज्य चांगले होते, आजही जुनी माणसं म्हणतात ते उगीच नाही.
मराठा समाज व समस्त हिंदू समाजाला मला सुचवायचे आहे, तुम्हां आम्हांला सांगितलेला औरंगजे़ब वेगळा आहे ब्राम्हणी लेखणी साहित्यातला पूण्यातल्या सदाशिव पेठेतला आहे. प्रत्यक्षातला वेगळा आहे.
हिंदू-मुस्लिम कायम तेढ रहावी यासाठी औरंगजेबाला ब्राम्हणी साहित्यातुन कायम बद़नाम केले जाते जे की अत्यंत चुकीचे आहे. मोगल- मराठा हे राजकीय युद्ध होते धार्मिक युद्ध नाही. हा लेख लिहिण्याचा उद्देश आहे कि खरा औरंगजे़ब समोर आणून एक महान सम्राटाला बद़नामी पासून वाचवणे व ब्राह्मणांची जी समाजात फुट पाडण्याची वृत्ती आहे तीला चपराक बसविणे आहे.मुस्लिम समाजाला माझी विनंती, की खरा औरंगजे़ब जगात समोर आणावा व एका महान बादशहास न्याय द्यावा.मुस्लिम लोकांनाही माहिती असावी
संवाद:मो दादासाहब पटेल