आदित्य ठाकरे वया नी लहान असू ध्या परंतु देशात तरुण पीढ़ी अपमान कर ने बवद्दल कोनाला हि आधिकार अधिकार नाही

चिलीच्या गॅब्रियल बोरिक या 36 व्या वर्षी पंतप्रधान झाल्या, तर फिनलंडच्या सना मरीन या 34 व्या वर्षी पंतप्रधान बनल्या. न्यूझीलंडच्या महिला पंतप्रधान जॅसिंडा अर्डर्न यांनी 42 व्या वर्षी पंतप्रधानपद सोडण्याचा निर्णय जाहीर केला. 2019 मध्ये 25 वर्षीय चंद्राणी मुर्मू बिजू जनता दलातर्फे लोकसभा निवडणूक ओडिशा मधून जिंकल्या. त्यांनी इंजीनियरिंगचे शिक्षण घेतले असून, त्या नोकरीच्या शोधात होत्या.

परंतु पटनायक यांनी त्यांना एकदम खासदारच बनवले भाजपने तेजस्वी सूर्य यांना वयाच्या 29 व्या वर्षी लोकसभेचे खासदार बनवले. देवेगौडांचे नातू प्रज्वल रेवण्णा आहे 29 वर्षाचे असतानाच, हासन येथून लोकसभेवर जिंकून आले. राजीव गांधी वयाच्या 40 व्या वर्षी भारतासारख्या विशाल देशाचे पंतप्रधान झाले. शरद पवार वयाच्या 38व्या वर्षी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले.

सुप्रियाताई सुळे वयाच्या 37 व्या वर्षी, 18 सप्टेंबर 2006 रोजी राज्यसभेच्या खासदार बनल्या. जगनमोहन रेड्डी 36 व्या वर्षी खासदार बनले, तर वयाच्या 46 ह्या वर्षी आंध्रचे मुख्यमंत्री झाले. इंदिरा गांधी वयाच्या 42 व्या वर्षी काँग्रेस अध्यक्ष झाल्या होत्या.

भारत हा जगात तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो. इथे तरुणांनाच अधिकाधिक संधी मिळायला हवी. प्रत्येक क्षेत्रात सर्व पक्षांमध्ये तरूणच पुढे आले पाहिजेत, असे आपण म्हणतो. आदित्य ठाकरे हे आमदार आहेत. मंत्री होते आणि राजकारणात ते सक्रिय होऊन बरीच वर्षे झाली आहेत. तरीदेखील ‘छोटा पेंग्विन’, ‘लहान मुलगा’, ‘बालक’, ‘महाराष्ट्रातला पप्पू’ या शब्दांत त्यांना हिणवले जाते. इथे आदित्य यांची बाजू घेण्याचा सवाल नाही. परंतु कोणत्याही पक्षातील तरुणाने एखादा प्रश्न उपस्थित केला की, ‘तू लहान आहेस’, ‘तुला काही समजत नाही’ असे ऐकवले जाते. देशातील तरुणाईचा अपमान करण्याचा कोणालाही अधिकार नाही.

तरुण जेव्हा अडचणीत आणणारे प्रश्न विचारतात किंवा सत्य सांगतात, तेव्हाच ‘तुला काय अक्कल आहे?’ अशी भाषा सुरू होते. उद्या भाजप अथवा शिंदेगटातील तरुण नेत्यांबद्दल अशीच तुच्छता कोणी प्रदर्शित केली, तर ते देखील तेवढेच निषेधार्ह असेल!-

साभार


हेमंत देसाई

SHARE THIS

RELATED ARTICLES

LEAVE COMMENT