आज चा दिवस इंदिरा गांधी चा पुण्य तिथि चा आहे.देश भक्ति इंदिरा गांधींच्या रक्तातच भीनलेली होती
नवी दिल्ली
संवाददाता
वयाच्या पाचव्या वर्षी त्यांनी आपली लाडकी बाहुली जाळून टाकली,
कारण ती इंग्लंडमध्ये तयार झाली होती, हे लहानग्या इंदूला कळाले होते..वयाच्या बाराव्या वर्षी इंदूने मुलांची एक वानरसेना तयार केली.
स्वातंत्र्य चळवळीच्या उपक्रमांसाठी झेंडे तयार करणे, लखोटे बनवणे, देशभक्तांचे व क्रांतिकारकांचे संदेश पोहोचवणे, आंदोलनांचे फलक लावणे ही कामे या वानरसेनेने केली.
त्याकाळात आंतरधर्मीय विवाह करण्याचे धाडस इंदिराजींनी दाखवले.
त्यास अनेक सनातनी लोकांनी विरोध केला. परंतु महात्मा गांधींनी या विवाहास पाठिंबा दिला आणि शुभेच्छाही दिल्या.
इंदिरा गांधी आणि मार्गारेट थॅचर यांची मैत्री होती.
1977 साली इंदिरा गांधींचा पराभव झाला. त्या सत्तेबाहेर फेकल्या गेल्या,
तरीदेखील थॅचर यांनी त्यांच्याशी मैत्रीचे संबंध कायम ठेवले होते. संपर्क ठेवला होता.
क्षण 1984 मध्येच मार्गारेट थॅचर यांना मारण्यासाठी दहशतवाद्यांनी बाॅम्बिंग केले, परंतु त्या वाचल्या, तेव्हा इंदिरा गांधींनी काळजीने त्यांना फोन केला आणि दहशतवाद्यांचा धिक्कार केला.
त्यानंतर काही दिवसांत अतिरेकी आपल्याला मारणार आहेत, याची त्यांना कल्पनाही नसेल.
इंदिरा गांधींनी आपले उच्च शिक्षण शांतिनिकेतनमध्ये घेतले होते. रवींद्रनाथ यांनी त्यांचे नाव ‘प्रियदर्शनी’ असे ठेवले.
आई आजारी असल्यामुळे आणि युरोपात उपचार घेत असल्याने, इंदिराजींना तिथे जायला लागले.
मग ऑक्सफर्ड विद्यापीठात त्यांनी आपले शिक्षण चालू ठेवले आणि इतिहास, राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र या विषयांत चमकही दाखवली.
मी लहान असताना 1960च्या दशकात इंदिरा गांधी पुण्यात आल्या होत्या, तेव्हा त्यांना प्रथम पाहिले होते. हिराबागेत त्यांचे भाषण होते.
पुढे ईंदिराजींना कोणीतरी भर सभेत दगडही मारला होता आणि त्यामुळे त्यांच्या नाकाला जखम झाली होती.
पुढे अनेक वर्षांनी इंदिराजींची प्रत्यक्ष भेट घेण्याचा योग आला. मी सहा वर्षांचा असताना पुण्यात नेहरू आले होते.
तेव्हा नेहरूंप्रमाणेच मला कुर्ता आणि जाकिट घालून, त्यात गुलाबाचे फूल खोचून, डोक्यावर टोपी घालून, वडिलांनी नेहरूंना बघण्यासाठी नेल्याचे आठवते! त्यांना बघायला मिळाल्याचा प्रचंड आनंद झाला होता.
आज इंदिराजिंच्या 37वी पुण्यतिथी, त्यानिमित्त हे सगळे आठवले. इंदिराजींना आदरांजली.-
साभार:
हेमंत देसाई