ही तर नवलाई नाही का ATM मधून डेबिट कार्ड न वापरताच काढता येणार रोकड ?
प्रतिनिधी.
बँका आपल्या ग्राहकांच्या सुविधांसाठी नव-नव्या सुविधा घेऊन येत आहेत.
आता असं एक एटीएम येत आहे ज्याच्या माध्यमातून तुम्ही डेबिट कार्ड किंवा पिन नंबर न वापरताही कॅश काढू शकणार आहात!
आता असं एक एटीएम येत आहे ज्याच्या माध्यमातून तुम्ही डेबिट कार्ड किंवा पिन नंबर न वापरताही कॅश काढू शकणार आहात.
आश्चर्य वाटतयं ना? पण हे एक स्वप्न नाहीये तर सत्य आहे.
या सुविधेच्या माध्यमातून तुम्ही एटीएम कार्ड किंवा पिन नंबरशिवाय एटीएम मशीनमधून पैसे काढू शकाल.
ग्राहकांना मिळणार फायदा एटीएम कार्ड हरवल्यानंतर बँकेतून नवं कार्ड मिळविण्यासाठी १० ते १५ दिवसांचा कालावधी लागतो.
जोपर्यंत तुम्हाला एटीएम कार्ड मिळत नाही तोपर्यंत तुम्ही एटीएममधून पैसे काढू शकत नाही. मात्र, आता या सर्व चिंतांची गरज तुम्हाला नाहीये.
प्रायव्हेट सेक्टरमधील मोठ्या बँकांपैकी एक असलेल्या येस बँक (Yes Bank)ने फिनटेक क्षेत्राची स्टार्टअप नियरबाय टेक्नोलॉजीजसोबत एक करार केला आहे.
या करारानुसार नियरबाय टेक बँकेला आधार आधारित असं एटीएम कार्ड उपलब्ध करुन देणार आहे ज्यासाठी पिन नंबरची आवश्यकता लागणार नाही.
स्मार्टफोनवर करता येणार वापर पेनियर मोबाईल अॅप्लिकेशनचा वापर स्मार्टफोनवर करता येणार आहे.
यामध्ये कुठलाही रिटेलर ग्राहकांसाठी आधार एटीएम-आधार बँकेच्या रुपात काम करेल आणि रोकड जमा करण्याची किंवा देण्याची सुविधा देऊ शकेल.
येस बँक आणि नियरबायने ही सुविधा सुरु करण्यासाठी नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियासोबत काम केलं आहे!
नेटवर्कमध्ये ४०,००० टच पॉईंट्स असणार
पेनियरबाय आधार एटीएम येस बँक आणि बिझनेस करन्सपॉन्डंटच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे.
याच्या नेटवर्कमध्ये ४०,००० टच पॉईंट्स असतील.
आधार नंबर आणि बोटांच्या ठशांचा वापर करुन ग्राहक या ठिकाणांहून रोकड काढू शकतील. तसेच इतर व्यवहार करु शकतात.
नियरबायने आधार सेवेच्या सुविधांबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी आणि लोकप्रिय बनविण्यासाठी रिटेलर्स असोसिएशन ऑफ इंडियासोबत करार केला आहे!