स्वच्छ शहर च्या यादीत सिंधुदुर्ग जिल्हा नंबर वन !

sindhudurg-fort

प्रतिनिधी.

देशातील सर्वाधिक स्वच्छ शहरांच्या यादीमध्ये महाराष्ट्रातील सिंधुदुर्गने पहिला क्रमांक पटकाविला असून, कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी आणि ठाणे या जिल्ह्यांनीही पहिल्या दहा स्वच्छ शहरांमध्ये स्थान मिळविले आहे. पर्वतराजींमध्ये वसलेल्या जिल्ह्यांच्या यादीमध्ये हिमाचल प्रदेशमधील मंड्या अग्रस्थानी आहे. देशातील ५३ शहरांमध्ये आणि डोंगरामध्ये वसलेल्या २२ गावांमध्ये ‘क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया’ (क्यूसीआय) यांच्या वतीने हे सर्वेक्षण राबविण्यात आले.

केंद्रीय ग्रामविकास मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी गुरुवारी या संदर्भातील माहिती दिली. ‘क्यूसीआय’ने केलेल्या सर्वेक्षणानुसार देशभरातील यंदाच्या वर्षीच्या सर्वाधिक स्वच्छ शहरांची घोषणा करण्यात आली. त्यानुसार महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग पहिल्या स्थानी आहे. सिंधुदुर्गने १०० पैकी ९६.८ गुण मिळविले आहेत. तर तर तिसऱ्या स्थानी असलेल्या साताऱ्याने ९२.९ गुणांची कमाई केली आहे. कोल्हापूरने ९१.६ गुणांची कमाई करीत पाचवे स्थान मिळविले आहे. तर रत्नागिरी आणि ठाण्याला अनुक्रमे ९०.९ आणि ८८.७ गुणांसह आठव्या आणि नवव्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे. पहिल्या दहा जिल्ह्यांमध्ये पश्चिम बंगालमधील नादिया, पूर्व मिदनापूर आणि हुगली, कर्नाटकातील उडुपी तसेच राजस्थानातील चुरू या जिल्ह्यांचा समावेश आहे.

डोंगरांमध्ये वसलेल्या जिल्ह्यांच्या क्रमवारी मंड्यापाठोपाठ हिमाचल प्रदेशातील शिमला, हमीरपूर, कुल्लू आणि चम्बा, सिक्कीममधील पश्चिम सिक्की, पूर्व सिक्कीम, दक्षिण सिक्कीम आणि उत्तर सिक्कीम तर मिझोरममधील चम्फाई या जिल्ह्यांचा समावेश आहे ।

SHARE THIS

RELATED ARTICLES

LEAVE COMMENT