सावित्री”च्या नव्या पुलाच अखेर लोकार्पण ; निष्पाप मृत्युमुखी पडलेल्या लोकांना फक्त श्रद्धांजली !
प्रतिनिधि.
महाड येथील सावित्री नदीच्या पुलावरील ३ ऑगस्टची ती काळ रात्र आठवली की आजही अंगावर काटा उभा राहतो.
आजही त्या घटनेची आठवण झाली की, हृदयाचे ठोके जागच्या जागी थांबतात.
सावित्री नदीवरील ब्रिटीशकालीन पूल कोसळून एक दोन नव्हे तर तब्बल ४० जणांचे निष्पाप जीव घेणाऱ्या घटनेला वर्ष पूर्ण व्हायला अवघे दोन महिने शिल्लक आहेत.
या दुर्दैवी घटनेनंतर ६ महिन्यात नवीन पूल उभारू अशी घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली होती.
त्यांनी केलेल्या घोषणेनुसार सहा महिन्यात नाही पण १० महिन्यात हे पूल उभं करण्यात आले.
सोमवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या पुलाचा लोकार्पण करून सावित्रीच्या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या लोकांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली वाहीली.
गेल्या वर्षी 3 ऑगस्ट रोजी मुसळधार पावसात सावित्री नदीवरचा पूल वाहून गेला.
या दुर्घटनेत दोन एसटी बस आणि एक तवेरा गाडी बुडाली. तर सर्वच्या सर्व 40 जणांचा मृत्यू झाला होता.
या दुर्घटनेनंतर नितीन गडकरी यांनी 6 महिन्यात नवा पूल उभारण्याची घोषणा केली होती.
मात्र दहा महिन्यांनी या पुलाचं काम पूर्ण झाल. त्यानुसार हा तीन पदरी आणि 239 मीटर लांबीचा पूल बांधून तयार झाला असून सोमवारपासून तो वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.
नवीन पुलामध्ये अँटीक्रॅश बॅरियर आणि दोन्ही बाजूने एक मीटर रुंदीचा फूटपाथ असेल.
239 मीटर लांबीच्या तीन पदरी पुलाच्या बांधकामासाठी 27 कोटी रुपयांचा खर्च आला आहे.
या पुलाच सोमवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
यावेळी केंद्रीय रस्ते, वाहतूक व महामार्ग आणि जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गिते, सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, रायगड।