सावधान मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरील कुठल्याही फूडमाॅल वरती चहा, नाशट्या साठी थांबू नये कारण !

images (1)

प्रतिनिधि.

कारण हा चहा नाश्ता तुम्हाला 500 ते 1000 रूपयाला पडू शकतो!
मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरील फूडमाॅल व पेट्रोल पंपा वरती वाहनांची टायर पंचर करणारी तसेच वाहनांचे पार्ट चोरणारी मॅकनिक व पंचरवाल्याची टोळी सक्रिय आहे.*
आज मी, मुंबई वरून पुण्याला शेअरींग कॅब ने प्रवास करत होतो.

तळेगाव टोल नाका संपल्यावरती ड्रायव्हरला (कॅबच्या मालकाला) चहा पिण्याची तलब झाली.
त्यांने फूडमाॅल वरती गाडी पार्क केली, माझ्या सहित सर्वच प्रवासी, कॅब खाली उतरून चहा घ्यायला गेले!
साधारण 10 मिनीट लागले असतील.

सर्व प्रवासी गाडीत बसणार तेव्हढ्यात, एक अनोळखी व्यक्ती गाडीपाशी आली व ड्रायव्हरला म्हणाली
“सर, आपका टायर पंचर है”
आम्ही सर्व टायर कडे बघतो तर काय, जोर जोरात हवा जात होती.

मग काय वैताग आला, म्हणटल “साला घरी जाऊन हा बाबा चहा प्याला असता तर काय बिघडले असते?”
असो …
पुढे तिथेच पंचरवाला होता त्याला पंचर काढायला ड्रायव्हरने सांगीतले, पंचरवाल्याने टायर मध्ये 4 पंचर सांगीतले, एक पंचर 200 रूपायला म्हणजे 4 पंचरचे 800 रूपये!

पंचरवाल्याला ड्रायव्हरने विचारले भय्या इतना पंचर कैसे?
तर तो म्हणाला “आपने पंचर मे गाडी चलाया होगा इसलिये हूवा है”
पंचर काढले, पैसे दिले, गाडी स्टार्ट करणार तेव्हढ्यात एका प्रवाशाला टाॅयलेटला आली, बोलला पाच मिनिटात आलो!

मना मध्ये त्याला मी, (दोनचार पुणेरी शिव्या हासडल्या म्हणटल ऐवढ्या वेळ काय झोपला होता?)
मी, विंडो सिट वरती असल्यामुळे कारच्या खाली उतरलो तर, माझे लक्ष त्या अनोळखी व्यक्तीकडे गेले, ज्यांने ड्रायव्हरला टायर पंचर झाले आहे हे सांगीतले होते.
तिच व्यक्ती परत दुसर्या एका कार चालकाला आपका टायर पंचर” आहे म्हणून सांगत होती.

इतक्यात आमच्या कॅब मधला टाॅयलेटला गेलेला तो प्रवासी आला, गाडी स्टार्ट झाली आम्ही निघालो.
पण, मला हे विचित्र वाटले!
दहा मिनीटाच्या ब्रेक मध्ये गाडी पंचर होते…
हवा जोर जोरात जाते…
अनोळखी व्यक्ती येऊन सांगते टायर पंचर आहे…
पंचरवाला चार पंचर सांगतो…
विचारल्या वरती आपने पंचर मे चलाया होगा असे उत्तर देतो…
परत तिच अनोळखी व्यक्ती दुसर्या वाहनचालकाला पंचर असल्याचे सांगते…
म्हणजे *(माझ्यातला एसीपी प्रद्यूमन जागा झाला!)
नक्कीच कुछ तो गडबड है।
हे मला कार मध्ये बसल्यावरती जाणवले!

मागे, एकदा बाणेर रोड वरती व एक्सप्रेस हायवेला अशाच टायर पंचर करण्याच्या, वाहनांचे ब्रेक फेल करण्याच्या, नट बोल्ट काढून घेण्याच्या घटना घडल्याचे मी वाचले होते, त्या घटनांची आठवण मला त्याच क्षणी झाली!

पण उपयोग काय, आम्ही तो पर्यंत वाकडला पोहचलो होतो, कॅबचालकाला 800 रूपयाचा चूना त्या पंचरवाल्याने व त्याच्या साथीदाराने लावलेला होता…!!!

सदर माहिती शेअर करण्याची एकमेव कारण म्हणजे तुमचा थोडासा निष्काळजीपणा तूमचा खिसा रिकामा करू शकतो,

आमच्या सोबत असणार्या कॅब चालकाला त्याच्या निष्काळजीपणाचा चहा 800 रूपायात पडला!
तुमच्या पैकी कोणाचे नातेवाईक, मित्रमंडळी इथून पूढे मुंबई पुणे एक्सप्रेस हाय वे वरून प्रवास करत असाल व फूडमाॅल वरती थांबणार असाल तर, पुढील सावधानता बाळगावी,

गाडी सीसीटीव्ही कॅमेरा लागलेला असेल तिथेच पार्क करावी, किंवा जमल्यास गाडीपाशी कोणी एक जणांने थांबावे, अनोळखी व्यक्ती वरती तसेच गाडीच्या आजूबाजूच्या हालचालींवर लक्ष ठेवावे!

मी तर, म्हणेल फूडमाॅल वरती न थांबलेलेच बरे…

बातमी वाचून तूमच्या नावासहित काॅपी पेस्ट करून शेअर केली तरी चालेल, कारण माझ्या दृष्टीने ही उपयुक्त माहिती लोकां पर्यंत पोहचणे जास्त गरजेचे आहे.

कृपया जास्तीत जास्त लाईक व शेअर करावी.

SHARE THIS

RELATED ARTICLES

LEAVE COMMENT