समत्ती ने लैंगिक संबंध आधी आधार कार्ड, पैन कार्ड ची गरज नाही?

वर्ताहार

नवी दिल्ली : स्त्री-पुरुषाच्या सहमतीने लैंगिक संबंध ठेवण्यापूर्वी स्त्रीच्या जन्मतारखेची पडताळणी म्हणजेच आधार कार्ड किंवा पॅन कार्ड तपासण्याची गरज नसल्याचे निरीक्षण दिल्ली उच्च न्यायालयाने हनीट्रॅप प्रकरणात अडकलेल्या एका पुरुषाला जामीन मंजूर करताना नोंदवले आहे.

जर पीडित महिला ही पुरुषाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा नोंदवून पैसे उकळणारी सराईत गुन्हेगार असेल तर या प्रकरणी सखोल चौकशी करण्याचे आदेशही न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत. आपल्या जोडीदारासोबत सहमतीने लैंगिक संबंध ठेवणाऱ्या व्यक्तीला जन्मतारखेची पडताळणी करण्याची काही गरज नाही.

लैंगिक संबंध ठेवण्यापूर्वी जोडीदाराला आधार कार्ड, पॅन कार्ड पाहण्याची गरज नाही, असं न्यायमूर्ती जसमीत सिंग यांनी म्हटले आहे.
ज्यावेळी बलात्काराची घटना घडली तेव्हा संबंधित महिलेने ती अल्पवयीन होती, असा दावा करत आधी संमतीने लैंगिक संबंध ठेवण्याचे आमिष दाखवले गेले. नंतर धमकी देऊन संशयिताने बलात्कार केल्याचे म्हटले होते.

या प्रकरणी न्यायालयाने लैंगिक संबध ठेवण्यापूर्वी आधार, पॅन तपासण्याची गरज नसल्याचे नमूद केले आहे. दरम्यान, न्यायालयात पीडित महिलेच्या जबाबत काही तथ्य आढळून नाही. तिने जवळपास वर्षभराच्या कालावधीत संशयिताकडून ५० लाख रुपये उकळले आहेत.

एफआयआर नोंदवण्याच्या एक आठवड्यापूर्वीच तिने पैसे उकळले होते आणि त्याच्यावर पोक्सो कायद्यातर्गंत गुन्हा दाखल करण्यात आला. जर अशा प्रकारच्या एफआयआरची नोंद दिल्लीतील इतर कोणत्याही व्यक्तीविरुद्ध झाली असेल, तर त्याची सखोल चौकशी करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.

SHARE THIS

RELATED ARTICLES

LEAVE COMMENT