वाशी रेलवे पोलिस ठाणे हद्द दिनांक 5=9=20 22रोज़ी दोन महलात मारामांरी,ची घटना घडली होती पूर्ण प्रकरण वीडियो पहा
वाशी रेल्वे पोलीस ठाणे हद्दीत दिनांक 05/09/22 रोजी 19.45 वा, सुमारास तुर्भे रेल्वे स्टेशन ते सिवूड रेल्वे स्टेशन दरम्यान मिडल महिला डब्यात, दोन महिला प्रवाशी याच्यामध्ये शिटवार बसण्याच्या करणावरून भांडण झाले होते, सदर डब्यातील इतर महिला प्रवाशी त्या भांडण करणाऱ्या महिला यांना भाडण करू नका असे सांगत होत्या.
परंतु ठाणे येथून बसलेल्या महिला नामे गुळनाथ जुबेर खान वय 50 वर्ष, आणि आरजू तोहीत खान वय 27 वर्ष रा. तळोजा नवी मुंबई, यांनी कोपैखरणे रेल्वे स्टेशन येथून चढलेल्या महिला प्रवाशी नामे स्नेहा ओकार दिवडे वय 20 वर्ष रा. कोपरखैरणे मारहाण करत होत्या म्हणून डब्यातील इतर महिला प्रवाशी यांनी नेरुळ रेल्वे स्टेशन आल्यावर फ्लाट क्र 1 वर गस्तीवार असलेल्या पोलीसना सांगितले होते. तात्काळ महिला पोलीस अंमलदार WHC/2060 उगले आणि WPN/2643 घाटकरी यांनी नमुद मारहाण करणाऱ्या महिला प्रवाशी यांना समजुन सांगत होत्या की, भांडण तंटा करू नका, तक्रार असेलतर द्या असे सांगु समज दिली होती.
नेरुळ वरुन गाडी चालु झाल्या नंतर ठाण्यावरून बसलेल्या दोन महिला प्रवाशी यांनी परत कोपरखैरणे वरून बसलेल्या महिला प्रवाशी यांना हाताने मारहाण करु लगल्या असता, यातील महिला नामे आरजू तोहीत खान हिने समजावून सांगत असलेल्या महिला अंमलदार WHC/उगले यांना तुम्ही मध्ये पडू का म्हणून छोटीशी चिनिमातीच असलेली कुडी डोक्यात मारून जखमी केले.
WHC/शारदा उगले हया सध्या वाशी मनपा हॉस्पिटल मध्ये महिला वॉर्ड मध्ये अंथरुग्ण म्हुणुन उपचार घेत आहेत. त्यांचा तक्रारी जबाबावरून ACR no 261/22 IPC 353, 332, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करून यातील महिला प्रवाशी नामे आरजू तोहीत खान वय 30 वर्ष यांना मेडिकल करून अटक केली आहे.