लातूरमधून दोन वर्षांत का झाली 180 मुली बेपत्ता ?
प्रतिनिधि.
लातूर जिल्ह्यात लग्नासाठी पैसे घेऊन मुली विकण्याचे प्रकार गेल्या अनेक वर्षांपासून सुरु असल्याची माहिती आहे.
लातूर जिल्ह्यातील अकरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीचे पळवून नेऊन सांगली जिल्ह्यातील तासगावच्या तरूणाशी लग्न लावून दिल्याचा खळबळजनक प्रकार नुकताच उघडकीस आला.
मुलीच्या तस्करीवरून विधानसभेत वादळी चर्चा झाल्याने या प्रश्नाचे गांभीर्य वाढले आहे.
वधूवर सूचक मंडळाच्या नावाखाली गोर-गरीब कुटुंबांना पैशाचे आमिष दाखवून मुलींची राज्याच्या इतर भागात विक्री करण्याचा हा प्रकार अनेक वर्षांपासून सुरु असल्याचे कळते.वधू-वर सूचक मंडळाच्या नावाखाली अशा गरजवंताचा शोध हे टोळके घेत असते.
अर्थात त्यासाठी तीन ते चार लांखाची रक्कम या टोळीकडून उकळली जाते.
पोलिसांच्या माहितीनूसार 2015 मध्ये जिल्ह्यातून 61 मुली बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती,
त्या सर्व मुलीं सापडल्या आहेत. 2016 मध्ये 60 मुली बेपत्ता झाल्या होत्या,
त्यापैकी 51 मुलींचा शोध घेण्यात पोलीसांना यश आले.
2017 मध्ये बेपत्ता झालेल्या 59 मुलीपैकी आतापर्यंत 34 मुली सापडल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे.
विशेष म्हणजे या सर्वमुली अल्पवयीन होत्या.
लातूर जिल्ह्यात महिला, मुली व अल्पवयीन मुलींच्या बेपत्ता होण्याचे प्रमाण अधिक आहे.
परंतु अशा प्रकरणात मुलीचे पालक तक्रार देण्यास पोलीसांकडे गेले तर तक्रार दाखल करून घेण्यास टाळाटाळ केली जाते असा आरोप काही कुटुंब व स्वयंसेवी संस्थानी केल्याचे समजते.
हे आरोप खोडून काढतांना ज्या कुटुंबातील मुलगी बेपत्ता होते,
ते कुटुंब व पालकच तक्रार दाखल करण्यास तयार नसतात असे पोलीसांचे म्हणणे आहे.