राज्य प्रशासन द्वारा प्रतिबन्धित 15 लाख रु किमतीचा गुटखा केला जप्त 1 आरोपी घेतला ताब्यात !
रिपोर्टर.
दिनांक 23-09-2017 रोजी बार्शी शहरात पेट्रोलिंग करीत असताना गोपनिय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीवरून
बार्शी ताडसौंदणे रोडवरील इंडस्ट्री इस्टेट नं 2, प्लाँट नं 10 येथे.
एका इसमाने अवैधरित्या विक्री करीता गुटख्याचा साठा करून ठेवलेला आहे.
अशी खाञीशीर बातमी मिळालेवरून सदर ठिकाणी बार्शी पोलीस ठाणे कडील टिमने छापा टाकला असता,
सदर ठिकाणी एक इसम गोण्यामधून गुटख्याच्या पूड्या काढताना मिळून आला.
त्यास ताब्यात घेवून त्याचे नाव विचारता त्याने त्याचे नाव सागर दिलीप शिंदे रा बार्शी असे सांगीतले.
लागलीच अन्न व औषध प्रशासन अधिकारी श्रीमती एन टी मुजावर यांना फोन करून सदर ठिकाणी बोलावून घेतले.
त्यांनी सदरचा मुद्देमाल चेक केला असता त्यात महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला गुटखा एकूण 15,03,810 रु किमतीचा मुद्देमाल सहित आढळून आला.
पुढील कारवाई साठी सहायक आयुक्त अन्न व औषध प्रशासन अधिकारी सोलापूर यांचे ताब्यात देण्यात आला.
पुढील कारवाई अन्न व औषध प्रशासन विभाग करीत आहे.
सदरची कारवाई मा. श्री विरेश प्रभू सर पोलीस अधिक्षक सोलापूर ग्रामीण यांचे आदेशान्वये, उपविभागीय पोलीस अधिकारी विजय कबाडे यांच्या मार्गदशनाखाली टिम मधील परि पोलीस उपअधिक्षक संदिप मिटके, पो.नि गजेंद्र मनसावले, पो.स.ई पंढरीनाथ बोधनापूड, पो.स.ई संदिप जाेरे, पोहेकाँ सहदेव देवकर, सचिन माने, पोना संताजी आलाट, अभय ऊंदरे, अशफाक शेख, संदेश पवार, पो.काँ. महेश बचुटे, महादेव सोलंकर, सचिन नितनात, महांतेश मुळजे, फिरोज बारगीर यांच्या टिमने केली आहे.